• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • 'कौन बनेगा करोडपती'मधील भोंदूगिरीचा अंनिसनं केला भांडाफोड; वाचा नेमकं प्रकरणं काय

'कौन बनेगा करोडपती'मधील भोंदूगिरीचा अंनिसनं केला भांडाफोड; वाचा नेमकं प्रकरणं काय

'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) या कार्यक्रमात दाखवलेल्या एका कथित प्रयोगावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) आक्षेप नोंदवला आहे. टीव्हीवर दाखवलेल्या चमात्काराचा अंनिसच्या कार्यकर्त्यांनी भांडाफोड केला आहे.

 • Share this:
  मुंबई, 19 नोव्हेंबर: टीव्हीवरील 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) या कार्यक्रमाचे देशभरात लाखो चाहते आहेत. देशातील असंख्य दर्शक नियमितपणे न चुकता कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम पाहत असतो. पण या कार्यक्रमात दाखवलेल्या एका कथित प्रयोगावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) आक्षेप नोंदवला आहे. टीव्हीवर दाखवलेल्या चमात्काराचा अंनिसच्या कार्यकर्त्यांनी भांडाफोड केला असून कथित प्रयोगामागचा फोलपणा उलगडून दाखवला आहे. नेमकं प्रकरण काय आहे? 'कौन बनेगा करोडपती' या टीव्ही मालिकेच्या अलीकडील एका भागात एक कथित प्रयोग दाखवण्यात आला होता. ज्यामध्ये काही लहान मुलं डोळ्यावर पट्टी बांधून वाचून दाखवत असल्याचं प्रसारित करण्यात आलं होतं. पण या कथित प्रयोगावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप नोंदवला असून विज्ञानाच्या नावाखाली सुरू असलेल्या भोंदूगिरीला पालकांनी बळी पडू नये असं आवाहनं अंनिसनं केलं आहे. हेही वाचा-प्रसूतीदरम्यान आईच्या मृत्यूनंतर पित्याचा भयावह शेवट;बाळाच्या नशिबी अनाथाचं जगणं तसेच 'कौन बनेगा करोडपती'च्या निर्मात्यांनी संबंधित प्रयोगाबद्दल दिलगीरी व्यक्त करावी अशी मागणी देखील अंनिसने केली आहे. या चमत्काराचा दावा करणाऱ्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून किंवा अंधारात मजकूर वाचून दाखवल्यास 21 लाखांचं बक्षिस दिलं जाईल, असंही अंनिसकडून जाहीर करण्यात आलं आहे. हेही वाचा-खाल्लं-प्यायलं आणि उलटले; नेत्यांनी पैसे बुडवल्याने व्यावसायिकाची आत्महत्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य कार्यवाहक मिलिंद देशमुख आणि पुणे शाखेचे अध्यक्ष श्रीपाल ललवाणी यांनी गुरुवारी कथित प्रयोगामागचा कथित फोलपणा उलगडून दाखवला आहे. यावेळी 12 वर्षाच्या मुलाने डोळ्याला पट्टी बांधून त्याला वाचण्याचे आणि रंग ओळखण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले आहे. तसेच राष्ट्रीय टीव्हीवरून अशा प्रकाराच्या कार्यक्रमातून भोंदूगिरी आणि चमत्काराचे प्रयोग दाखवल्याने समाजात अंधश्रद्धा पसरत असल्याचं अंनिसनं सांगितलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published: