• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • लसीकरण केंद्रावर वाद भोवला, शिवसेना नगरसेविकेवर गुन्हा दाखल

लसीकरण केंद्रावर वाद भोवला, शिवसेना नगरसेविकेवर गुन्हा दाखल

मुंबईतील (Mumbai ) अंधेरी (Andheri) लसीकरण केंद्रावरच भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेविकांमध्ये राडा झाला होता.

  • Share this:
मुंबई, 09 मे: महाराष्ट्र सरकारने कोरोनाविरोधात (Maharashtra corona case) देत असलेल्या लढ्याचं पंतप्रधान मोदींनी कौतुक केल्यामुळे  भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये वाद पेटला आहे. तर दुसरीकडे.  मुंबईतील (Mumbai) अंधेरी (Andheri) लसीकरण केंद्रावरच भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेविकांमध्ये राडा झाला होता. या प्रकरणी शिवसेनेच्या नगरसेविका आणि आरोग्य समिती अध्यक्ष राजूल पटेल यांच्या विरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील अंधेरी येथील स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. शनिवारी सकाळी 11.30 च्या सुमारास कार्यक्रम पार पडला. पण यावेळी लस देण्यावरून भाजप भाजप आमदार भारती लव्हेकर, नगरसेवक योगीराज दाभाडेकर, भाजपच्या रंजना पाटील आणि शिवसेना नगरसेविका राजूल पटेल यांच्यात बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुकी सुद्धा झाली. यामुळे लसीकरण केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर भारती लव्हेकर यांन आंबोली पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. घडलेल्या प्रकरणावरून शिवसेनेच्या नगरसेविका राजूल पटेल यांच्या विरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  उर्मिला रवी गुप्ता यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजुल पटेल यांच्यासह हारून खान, सुबोध चिटणीस यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी यांना ओढून त्यांच्या छातीवर हात टाकून त्यांचा विनयभंग केला, तसंच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला. या
Published by:sachin Salve
First published: