News18 Lokmat

VIDEO :...आणि नारायण राणेंनी दिल्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

आता उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात त्या राहुल गांधींपेक्षा माझ्या शुभेच्छा मोठ्या आहे असा राणेंनी उपरोधिक टोलाही लगावला.

News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2018 05:36 PM IST

VIDEO :...आणि नारायण राणेंनी दिल्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

मुंबई, 27 जुलै : एकेकाळी शिवसेनेत असलेले नारायण राणे यांचं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवरच प्रेम आणि उद्धव ठाकरेंवरचा राग जगजाहीर आहे. मात्र, आज नारायण राणे यांनी चक्क शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. राज्यभरात शिवसैनिक उद्धव ठाकरेंवर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. एकेकाळी शिवसेनेत असलेल्या नारायण राणे यांनी आज उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.  उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, तुमच्या सगळ्यांच्याच (पत्रकारांच्या) साक्षीने शुभेच्छा देतो असं राणेंनी आपल्या शैलीत सांगितलं. तसंच आता उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात त्या राहुल गांधींपेक्षा माझ्या शुभेच्छा मोठ्या आहे असा राणेंनी उपरोधिक टोलाही लगावला.

पेच येणार नाही, सरकार मराठा आरक्षण देऊ शकते-नारायण राणे

तसंच अलीकडे सामनाच्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जाऊन रामलल्लाचं दर्शन घ्यायला जाईल असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावर राणेंनी आपल्या शैलीत टोला लगावला. अयोध्येत जातायचं तर वाराणसी यापुढे हिमालय ही आहे, भगवी वस्त्र घालून तिथं जायला हवे असा खोचक टोलाही राणेंना लगावला.

दरम्यान, मराठा संघटनेच्या सदस्यांनी आज नारायण राणेंची भेट घेतली. या भेटीसाठी शशिकांत जगताप, बाळासाहेब शिंदेंनी हे सकल मराठा मोर्चाचे सदस्य होते. मराठा आरक्षणाबाबत राणेंसोबत संघटनेच्या सदस्यांची चर्चा झाली. आणि अनावश्यक दाखल केलेल्या केसेस मागे घेण्याची मागणीही केली. या बैठकीनंतर राणेंनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

Loading...

मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. जाळपोळ सुरू, सरकार ही आरक्षण वतीने प्रतिक्रिया देतात. आंदोलनाने हिंसक वळण घेतले ते थांबावे यासाठी मुख्यमंत्र्यांना मी भेटलो. सरकार हे आंदोलन थांबल्यास ठराविक महिन्यात करायला तयार आहे. राज्यात आंदोलन जे सुरू ते थांबावे ही मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे असं राणेंनी सांगितलं.

जातीवर नाही तर आर्थिक निकषांवर आरक्षण द्या - राज ठाकरे

तसंच आज काही संघटनाशी बोललो. आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका आमची आहे. दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांना यांना भेटून आरक्षण बाबत संघटना मागणी समोर ठेवेल असं आश्वासन राणेंनी दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 27, 2018 05:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...