• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • अनन्या पांडेचे 7 इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये, सोमवारी होणार पुन्हा चौकशी

अनन्या पांडेचे 7 इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये, सोमवारी होणार पुन्हा चौकशी

केवळ व्हॉट्सअॅप चॅटच्या (Whatsapp Chats) आधारावरच कोणतीही चौकशी केली जाणार नाही आहे.

  • Share this:
    मुंबई, 23 ऑक्टोबर: अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) हिची येत्या सोमवारी पुन्हा एकदा एनसीबी (NCB) चौकशी करणार आहे. दरम्यान एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी जेव्हा अनन्या पांडेची चौकशी केली जाईल, त्यावेळी केवळ व्हॉट्सअॅप चॅटच्या (Whatsapp Chats) आधारावरच कोणतीही चौकशी केली जाणार नाही आहे. एनसीबी सोमवारी अनन्या पांडेला संशयास्पद (Suspicious Financial Transactions) आर्थिक व्यवहार, आरोपींचे स्टेटमेंट आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे Electronic Evidences)याबाबत चौकशी करेल. एनसीबीनं 2 दिवस चौकशी केल्यानंतर सोमवारी सकाळी 11 वाजता अनन्या पांडेला पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी चौकशीपूर्वी एनसीबीला आपली तयारी पूर्ण करायची आहे. अनन्याचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स NCB कडे एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री अनन्या पांडेचे 7 इलेक्ट्रॉनिक गॅझेट फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. यामध्ये मोबाईल आणि लॅपटॉपचाही समावेश आहे. या फॉरेन्सिक तपासणीद्वारे, एनसीबीला त्या चॅट्स आणि इतर तपशील जाणून घ्यायचं आहेत, जे कदाचित हटवण्यात आले असतील. एनसीबीला हे चॅट्स रिट्रीव करायचे आहेत. जर सोमवारपर्यंत हा डेटा रिट्रीव झाल्यास अनन्या पांडेची त्या आधारावर चौकशी केली जाईल. हेही वाचा-  नाशिक हादरलं,  काडीपेटी पेटवताच गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट अनन्यानं केला मोठा खुलासा अनन्या पांडेनं (Ananya Pandey) आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणाच्या (drugs case) चौकशीदरम्यान मोठा धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे आर्यन खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनन्या पांडेनं आर्यनला गांजा दिला असल्याची कबुली दिली आहे. अनन्याची आर्यनसोबत चॅटिंग केल्यावरुन एनसीबी (NCB is interrogating) तिची चौकशी करत आहे. हेही वाचा- लेहेंग्यात लपवून ऑस्ट्रेलियाला पाठवले जात होते 3 किलो ड्रग्ज, NCB नं केली कारवाई शुक्रवारी एनसीबीनं अनन्याची चार तास कसून चौकशी केली. आर्यनच्या मोबाईलमध्ये ड्रग्जसंदर्भातले अनन्यासोबत केलेले चॅट सापडले. एनसीबीनं गुरुवारी अनन्याच्या घरी जाऊनही तपासणी केली. शुक्रवारी चौकशीदरम्यान अनन्यानं आर्यनला एक ते दोन वेळा गांजा दिल्याचं एनसीबीला सांगितलं आहे. मात्र आपण कोणत्याच ड्रग्ज सप्लायरच्या संपर्कात नसल्याचंही तिनं म्हटलं आहे. अनन्या गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास वडील चंकी पांडे यांच्यासोबत चौकशीला हजर झाली. यावेळी एनसीबीनं सुमारे अडीच तास तिची चौकशी केली. पुन्हा शुक्रवारी सकाळी चौकशीला हजर राहण्यास सांगितलं होतं. एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे, व्ही. व्ही. सिंग आणि एक महिला अधिकाऱ्याच्या उपस्थितीत अनन्याची चौकशी करण्यात आली. अनन्या पांडेवर भडकले समीर वानखेडे अनन्या पांडेची सलग दोन दिवस NCB कडून चौकशी करण्यात आली. पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी अनन्याला 2 वाजता NCB कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र यावेळी अभिनेत्री 2 तास उशिरा म्हणजेच 4 वाजता पोहोचली होती. त्यामुळे तिची योग्य तशी चौकशी झाली नव्हती. त्यांनतर NCB सलग दुसऱ्या दिवशी अर्थातच शुक्रवारी पुन्हा तिला बोलावून घेतलं होतं. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशीही अनन्या उशिराच पोहोचली यावेळी तिला 11 ला बोलावण्यात आलं होतं मात्र ती चक्क 3 तास उशिरा म्हणजेच 2 वाजता कार्यलयात पोहोचली होती. हेही वाचा- Google वर सर्च करून पोटच्या मुलीला दिला भयंकर मृत्यू; आईचं राक्षसी कृत्य वाचून हादराल त्यामुळे NCB अधिकारी समीर वानखेडे तिच्यावर प्रचंड संतापले होते. यावेळी त्यांनी अनन्याला चांगलंच धारेवर धरत कडक शब्दात तिची कान उघडणी केली आहे. यावेळी वानखेडे यांनी अनन्याला म्हटलं, 'हे तुमचं शूटिंग नाही. किंवा तुमचं प्रोडक्शन हाऊस नाही. हे NCB चं कार्यालय आहे. याठिकाणी दिलेल्या निश्चित वेळीच तुम्हाला यावं लागेल. अधिकाऱ्यांना तुमच्यासाठी वाट बघत बसायला वेळ नाही'. असं म्हणत त्यांनी अभिनेत्रीला सुनावलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published: