गणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द

गणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द

अनंत चतुर्दशीच्या दिवशी रविवार असला तरी गणेश विसर्जन मिरवणूकीसाठीची गर्दी लक्षात घेता, मुंबई रेल्वे प्रशासनानं तिन्हा मार्गांवरचा मेगाब्लॉक रद्द केलाय.

  • Share this:

मुंबई, 22 सप्टेंबर : अनंत चतुर्दशीच्या दिवशी रविवार असला तरी गणेश विसर्जन मिरवणूकीसाठीची गर्दी लक्षात घेता, मुंबई रेल्वे प्रशासनानं तिन्ही रेल्वे मार्गांवरचा मेगाब्लॉक रद्द केलाय. त्यामुळे उद्या मध्य, पश्चिम आणि हार्बरवरून प्रवाशांना काहीसा दिलासा मिळालाय.

मुंबईतली विसर्जन मिरवणूक भव्य-दिव्य असते, ती पाहण्यासाठी मुंबईभरातून लाखो गणेश भक्त येत असतात. रस्त्यांच्या दुतर्फा प्रचंड गर्दी होते. त्यांना रेल्वेनं येणं-जाणं सोपं पडावं, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून , मुंबई रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातील प्रमुख रस्त्यांवरून श्रींची विसर्जन मिरवणूक मार्गस्थ होते. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी विसर्जनाच्या दिवशी दुतर्फा रांगा लागतात. ही मिरवणूक पाहण्यासाठी लांबच्या उपनगरांमधून मुंबईत लोक येतात. या प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि विसर्जन मिरवणुकीनंतर त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी तिन्ही मार्गावरील ब्लॉक रद्द करण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

 VIDEO : विश्वास नांगरे पाटलांनी डीजेविरोधात कारवाई करण्याचे दिले संकेत

First published: September 22, 2018, 10:08 PM IST

ताज्या बातम्या