Home /News /mumbai /

उद्धव ठाकरेंच्या टोलेबाजीनंतर आनंद महिंद्रांनी मानले त्यांचेच आभार, वाचा काय आहे प्रकरण

उद्धव ठाकरेंच्या टोलेबाजीनंतर आनंद महिंद्रांनी मानले त्यांचेच आभार, वाचा काय आहे प्रकरण

उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी एक खास ट्विट करुन मुख्यमंत्री ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे आभार मानले आहेत.

    मुंबई, 5 एप्रिल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी राज्याला संबोधित करताना उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांना नाव न घेता टोला लगावला होता. या टोलेबाजीवर विरोधी पक्षांनी आक्षेप घेत त्यांनी सरकारवर टीका केली होती. सरकार आणि विरोधी पक्षामध्ये या मुद्यावर राजकारण सुरु असतानाच आनंद महिंद्रा यांनी एक खास ट्विट करुन मुख्यमंत्री ठाकरे यांचे आभार मानले आहेत. काय म्हणाले महिंद्रा? 'संपूर्ण लॉकडाऊन न लावल्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. अथक परिश्रम करणाऱ्या दुकान मालकांबद्दल मला वाईट वाटते. आता कोरोना नियमांचे काटेकोर पालन करणे ही आपली जबाबदारी आहे. जेणेकरुन हे निर्बंधही लवकरात लवकर उठवण्यात येतील.' असं ट्विट महिंद्रा यांनी केले आहे. का सुरु झाला होता वाद? आनंद महिंद्रा यांनी काही दिवसांपूर्वी एका ट्विटद्वारे मुख्यमंत्री आणि सरकारच्या कारभाराबाबत वक्तव्य केलं होतं. लॉकडाऊनचा त्रास हा केवळ गरिबांना आणि छोट्या व्यावसायिकांना होत असतो. लॉकडाऊन हे आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून असते. त्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे असे ट्विट केले होते. ( वाचा : BREAKING : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर दिला राजीनामा ) त्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला संबोधित करताना नाव न घेता महिंद्रा यांना टोला लगावला होता. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या संबोधनामध्ये एका उद्योगपतीच्या वक्तव्याचा उल्लेख केला. या उद्योगपतीने लॉकडाऊन करण्याऐवजी आरोग्य सुविधा वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करा असा सल्ला दिला होता. आरोग्य सुविधा वाढवल्याच आहेत आणि त्या वाढवणे सुरुच आहे, पण केवळ आरोग्य सुविधा वाढवून चालणार नाही, तर त्यासाठी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांची गरज आहे. आरोग्य सुविधा हाताळण्यासाठी तज्ज्ञांची गरज भासत असते. त्यांचा पुरवठा हे उद्योगपती करणार का?  असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Anand mahindra, Covid19, Lockdown, Social media, Twitter, Uddhav thackeray

    पुढील बातम्या