भिवंडी 14 ऑगस्ट : रस्त्यावर कितीही वाहनांच्या रांगा असल्या तरी सगळ्यात आधी रस्ता मोकळा केला जातो तो अॅम्बुलन्साठी. कारण अॅम्बुलन्स लोकांचा जीव वाचविण्याचं काम करते. मात्र भिवंडीत एका अॅम्बुलन्सने चार जणांना धडक दिली. यात महिला आणि मुलंही जखमी झालीत. संतप्त नागरिकांनी अॅम्बुलन्सवर दगडफेक केली मात्र त्याही अवस्थेत ड्रायव्हरने गाडी घेऊन पळ काढला आता पोलीस त्या ड्रायव्हरचा शोध घेत आहेत.
भिवंडी-कल्याण रोडवरील अप्सरा टॉकीज समोर सुसाट वेगाने जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेने रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या चार जणांना सायंकाळी उडवले. ही गाडी अतिशय वेगात होती असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. यात दोन पुरुष एक महिला आणि एका लहान मुलांचा समावेश असून चारजण जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
टीकेनंतरही मुख्यमंत्र्यांची 'महाजनादेश' यात्रा पुन्हा सुरू होणार! या आहेत तारखा
स्थानिक तरुणांनी रुग्णवाहिकेची तोडफोड केली मात्र रुगवाहिका सुसाट वेगाने निघून गेली असून वाहतूक पोलीस रुग्णवाहिकेचा शोध घेत आहेत. अॅम्बुलन्सच्या ड्रायव्हरनेच असं केलं तर रुग्णांच्या जीवच धोक्यात येणार असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केलीय. अॅम्बुलन्सवर ड्रायवर ठेवताना पूर्ण पडताळणी केल्यावरच त्याची नेमणूक केली जावी अशी मागणीही केली जातेय.
महिलेच्या पोटात कोकेनचा साठा
मुंबई : ड्रग्सची तस्करी करणारे तस्कर अंमली पदार्थ लपविण्यासाठी ज्या क्लुप्त्या करतात त्या पाहून थक्क व्हायला होतं. अशाच एका प्रकरणात मुंबई पोलिसांनी एका विदेशी महिलेला अटक केलीय. मुंबई DRI ने ही करावाई करत तब्बल 5 कोटींच कोकेन जप्त केलंय. मुंबई आणि देशातल्या इतर महानगरांमध्ये हे कोकेन पोहोचवलं जाणार होतं. या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांचं एक आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.
अबब...रक्षाबंधानासाठीच्या या 'गोल्डन' मिठाईचा भाव ऐकला तर तुम्ही चाटच पडाल!
अंमली पदार्थ विरोधी पथकाला मुंबईत ड्रग्जचा मोठा साठ येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यादृष्टीने पथकाने मुंबई विमानतळावर सापळा रचण्यात आला होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका विदेशी महिलेला ताब्यात घेतलं. ही महिला ब्राझीलची राजधानी साओ पालोमधून आली होती.
बाबासाहेबांचे विचार संपविण्याचा प्रकाश आंबेडकरांचा प्रयत्न - कवाडे
पोलिसांनी जेव्हा झडती घेतली तेव्हा त्यांना तिच्याजवळ काहीही आढळून आलं नाही. मात्र पोलिसांना तिच्याजवळ ड्रग्ज असल्याची पक्की खात्री होती. त्यामुळे त्यांनी तिला ताब्यात घेऊन एक्स रे साठी कोर्टाची परवानगी मागितली. कोर्टाने परवानगी दिल्यावर त्या महिलेचा एक्स रे काढण्यात आल्या. त्यात जे दिसलं त्याने सर्वच अधिकारी चक्रावून गेले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा