मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'देवेंद्र सरकारमध्ये सहभागी होणार हे माहिती नव्हतं; हा धक्का..', अमृता फडणवीसांचा मुलाखतीत खुलासा

'देवेंद्र सरकारमध्ये सहभागी होणार हे माहिती नव्हतं; हा धक्का..', अमृता फडणवीसांचा मुलाखतीत खुलासा

अमृता फडणवीस यांनी शुक्रवारी न्यूज18 शी बोलताना सांगितलं की, महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या नाट्यमय बदलामुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. राज्यातील सरकार बदलणं ही माझ्यासाठीही आश्चर्याची बाब होती, असं त्या म्हणाल्या

अमृता फडणवीस यांनी शुक्रवारी न्यूज18 शी बोलताना सांगितलं की, महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या नाट्यमय बदलामुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. राज्यातील सरकार बदलणं ही माझ्यासाठीही आश्चर्याची बाब होती, असं त्या म्हणाल्या

अमृता फडणवीस यांनी शुक्रवारी न्यूज18 शी बोलताना सांगितलं की, महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या नाट्यमय बदलामुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. राज्यातील सरकार बदलणं ही माझ्यासाठीही आश्चर्याची बाब होती, असं त्या म्हणाल्या

  • Published by:  Kiran Pharate

प्रीति सोमपुरा

मुंबई 09 जुलै : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली. एकनाथ शिंदेंसह शिवसेना आणि महाविकास आघाडीतील अपक्ष आमदारांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रातील या राजकीय नाट्यात देवेंद्र फडणवीसांची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. मात्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी News18 सोबत याबाबत बातचीत करताना अनेक खुलासे केले.

अमृता फडणवीस यांनी शुक्रवारी न्यूज18 शी बोलताना सांगितलं की, महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या नाट्यमय बदलामुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. राज्यातील सरकार बदलणं ही माझ्यासाठीही आश्चर्याची बाब होती, असं त्या म्हणाल्या. त्यावेळी मी देशात नव्हते. मी लंडनमध्ये होते, असंही त्यांनी सांगितलं (Amruta Fadnavis on Maharashtra Government Formation).

मंत्रिमंडळात शिंदे गटाला 13 मंत्रिपदं; बैठकीत शिक्कामोर्तब? आज पंतप्रधानांची भेट घेणार मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नाराज गटाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला आणि आणि भारतीय जनता पक्षासोबत महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन केलं. मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सरकारमध्ये सहभागी होणार की नाही, याबाबत शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्चितता होती. अमृता म्हणाल्या, 'मला वाटलं होतं की देवेंद्र फडणवीस सरकारचा भाग होणार नाहीत, पण त्यांनी पक्षाच्या आदेशाचं पालन केलं.'

अमृता फडणवीस म्हणाल्या, 'माझ्यासाठी हे सुखद आश्चर्य होतं. शपथविधीच्या दिवशी माझी मुलगी दिविजा घरीच होती. देवेंद्रने तिला काहीच न बोलता तिकडे नेलं. राजभवनात पोहोचल्यावर तिला कळालं की तिचे वडील आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. अमृता म्हणाल्या, 'मी नागपुरात होते आणि लोकांनी देवेंद्रवर दाखवलेलं प्रेम पाहून भावुक झाले. महाराष्ट्रात आता विकासाभिमुख सरकार आहे.' आता सागर बंगल्यासोबत एक खास नातं जोडलं गेलं आहे. त्यामुळे आम्ही ही जागा सोडून कुठे जाईल असं वाटत नसल्याचंही त्या म्हणाल्या.

साडेनऊला सुरू झालेली बैठक रात्री 2 वाजता संपली; अमित शाहांसोबतच्या चर्चेत काय ठरलं?

महाराष्ट्रात आठवडाभर चाललेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्‍वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी २९ जूनच्या रात्री फेसबुक लाईव्हवर येऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शपथविधीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत शिंदे गटासह शिवसेना-भाजप युती सरकारची माहिती दिली होती.

पत्रकार परिषदेत स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव जाहीर केलं. तेव्हा त्यांनी या सरकारमध्ये सहभागी होणार नसून ते यशस्वी करण्यासाठी बाहेरून पूर्ण सहकार्य करणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, त्यानंतर लगेचच भाजप अध्यक्ष जेपी नेड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सरकारमध्ये सामील होणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर फडणवीस यांनी 30 जून रोजी राजभवनात सायंकाळी 7 वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

First published:

Tags: Amruta fadnavis, Devendra Fadnavis, Eknath Shinde