अमृता फडणवीसांचा नवा लूक, संक्रांतीच्या दिल्या खास शुभेच्छा

अमृता फडणवीसांचा नवा लूक, संक्रांतीच्या दिल्या खास शुभेच्छा

'मला जे आवडंत ते मी करते. निर्णय घेण्याचं मला पूर्ण स्वातंत्र्य आहे. आणि देवेंद्र यांनाही ते मान्य आहे.'

  • Share this:

मुंबई 15 जानेवारी : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियावर सक्रिय असतात. फेसबुक, ट्वीटर आणि इंन्स्टाग्रामवर त्या कायम आपली मतं मांडतात आणि फोटोही टाकत असतात. नव्या वर्षांच्या शुभेच्छा असो की संक्रांतीच्या, त्या देतांना त्यांचा वेगळेपणा दिसून येतो. संक्रांतीच्या शुभेच्छा देतानाच त्यांनी लोहारीच्या शुभेच्छा दिल्या आणि आपला एक खास फोटोही शेअर केला. तिळ गुळ घ्या गोड गोड बोला - मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा - और लोहरी दी लाख लाख वधाइयाँ ! अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत.

या शुभेच्छा देतानाच त्यांनी आपला एक खास फोटो शेअर केलाय. गुलाबी ब्राईट घागरा आणि त्यावर गोल्डन कलरचं शॉर्ट जॅकेट त्यांनी घातलेलं आहे. या पेहेरावात त्या प्रसन्न दिसत आहेत. अॅक्सिस बँकेत उच्च पदावर असलेल्या अमृता फडणवीस यांचं गाणं आणि फॅशन हे 'पॅशन' आहे. फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्या अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय राहत होत्या.

त्यांच्या या फॅशन आणि गाण्यांवरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात येतं. मात्र त्यावर त्यांनी कधी प्रतिक्रिया दिली नाही. त्यांच्या या सहभागाबद्दल त्यांना काही वर्षांपूर्वी जेव्हा विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की, मी मुख्यमंत्र्यांची पत्नी असली तरी माझं व्यक्तिमत्व हे स्वतंत्र आहे.

मला जे आवडंत ते मी करते. निर्णय घेण्याचं मला पूर्ण स्वातंत्र्य आहे. आणि देवेंद्र यांनाही ते मान्य आहे. राजकारणावर त्या फारशा व्यक्त होत नाहीत. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याने नवा वाद निर्माण झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 15, 2020 05:49 PM IST

ताज्या बातम्या