अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर सर्वात मोठा हल्लाबोल

अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर सर्वात मोठा हल्लाबोल

भाजपची सत्ता गेल्यानंतर त्यांची ट्विटरवरची सक्रियता जास्तच वाढली असून त्यांनी आता थेट शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावरच हल्लाबोल करायला सुरुवात केलीय.

  • Share this:

मुंबई 22 डिसेंबर : अमृता फडणवीस या गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर कमालीच्या सक्रीय झाल्या आहेत. भाजपची सत्ता गेल्यानंतर त्यांची ट्विटरवरची सक्रियता जास्तच वाढली असून त्यांनी आता थेट शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावरच हल्लाबोल करायला सुरुवात केलीय. देवेंद्र फडणवीस यांनी 14 डिसेंबरला सावरकरांच्या मुद्यावरून राहुल गांधींवर टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधलाय. या आधीही अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती. आत्तापर्यंत अमृता फडणवीस या फक्त सामाजिक बाबींवरच ट्वीट करत असत. आता मात्र त्या थेटपणे राजकीय विषयांवर टीका करू लागल्याने आश्चर्य व्यक्त होतंय. माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही त्यामुळे मी माफी मागणार नाही असं राहूल गांधी यांनी दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात म्हटलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. फक्त गांधी आडनाव असून चालत नाही. त्यासारखं काम करावं लागतं. त्यानुसार काम केलं तरच माणसं मोठी होतात अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

'लष्कराचा प्रमुख होणार असलो तरी बायकोचं ऐकावचं लागतं'

त्यावर आता आठ दिवसांनी अमृता फडणवीस यांनी ट्विटरूवरून प्रतिक्रिया देत हल्लाबोल केलाय. त्या म्हणाल्या, खरंय देवेंद्रजी, फक्त 'ठाकरे' आडनाव असून सुद्धा कोणी 'ठाकरे' होऊ शकत नाही. फक्त आपलं कुटुंब आणि सत्ता या पलिकडे जाऊन लोकांसाठी प्रमाणिकपणे काम करावं लागतं अशी थेट टीकाच त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलीय.

अमृता फडणवीस टीका करतात त्याबद्दल काय वाटतं असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना एका मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी उत्तर देत त्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या आहेत. त्यांनी काय करावं आणि करू नये हे मी त्यांना सांगत नाही. आणि सांगूनही त्या ऐकतीलच असं नाही असं उत्तर त्यांनी दिलं होतं.

First published: December 22, 2019, 10:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading