मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'शिवबंधन' बांधल्यानंतर अनिल जयसिंघानी फरार, अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात नवा ट्वीस्ट!

'शिवबंधन' बांधल्यानंतर अनिल जयसिंघानी फरार, अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात नवा ट्वीस्ट!

अनिल जयसिंघानीचं राजकीय कनेक्शन, शिवसेनेत केला होता प्रवेश

अनिल जयसिंघानीचं राजकीय कनेक्शन, शिवसेनेत केला होता प्रवेश

अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणी आता नवनवी धक्कादायक माहिती समोर येत आहे. फरार अनिल जयसिंघानी याने उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

अजित मांढरे, प्रतिनिधी

मुंबई, 17 मार्च : अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल तसंच लाच द्यायचा प्रयत्न केलेल्या अनिक्षा जयसिंघानीला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी काल अनिक्षाला ताब्यात घेतल्यानंतर तिला आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. अनिक्षाने तिचे वडील अनिल जयसिंघानी यांना सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना पहिले लाच ऑफर केली आणि त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करण्यात आल्याचा आरोप आहे.

अनिल जयसिंघानीचं पॉलिटिकल कनेक्शन

दरम्यान फरार असलेल्या अनिल जयसिंघानी याचं पॉलिटिकल कनेक्शन आता समोर येत आहे. अनिल जयसिंघानी याने 2014 साली शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, त्याचे फोटो आता समोर आले आहेत. अनिल जयसिंघानी याने उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला होता. 2014 साली शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अनिल जयसिंघानी 2015 च्या आसपास फरार झाल्याची माहिती आहे.

शिवसेनेत प्रवेश करण्याआधी अनिल जयसिंघानीने काँग्रेस तसंच राष्ट्रवादीच्या तिकीटावर उल्हासनगर महापालिकेची निवडणूक लढली होती. अनिल जयसिंघानीने 1995 साली उल्हासनगर महापालिकेसाठी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढली, यात त्याचा पराभव झाला, यानंतर 1997 सालीही तो काँग्रेसच्या तिकीटावर पराभूत झाला. यानंतर 2002 साली अनिल जयसिंघानी राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभा राहिला, तेव्हा त्याला विजय मिळवला.

फडणवीसांनी विधानसभेत सांगितला घटनाक्रम

दरम्यान या सर्व प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत खुलासा केला. या प्रकरणात अमृता फडणवीस यांच्यावर दबाव आणला गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. अनिल जयसिंघानी हा व्यक्ती फरार आहे. त्याची मुलगी 2015-2016 मध्ये अमृता फडणवीस यांना भेटली होती. त्यानंतर पुन्हा 2021 मध्ये त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. डिझायनर असल्याचं सांगून तिने अमृता फडणवीस यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर आई वारल्याचं सांगून पुस्तक प्रकाशन करून घेतले असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना फडणवीस यांनी म्हटलं की, या मुलीने विश्वास संपादन करून डिझायनर कपडे परिधान करण्यास दिले. त्यानंतर वडिलांना काही चुकीच्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा दावा या मुलीने केला, तसेच अमृता फडणवीस यांना निवेदन देण्यास सांगण्यात आले. त्यानंतर काही बुकींना आपण ओळख असल्याचंही या मुलीने सांगितलं. या प्रकरणात अमृता यांनी दुर्लक्ष केलं, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

एक कोटीचं आमिष

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, या मुलीने वडिलांना सोडविण्यासाठी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपये देण्याचं आमिष दाखवलं. मात्र त्यानंतर चुकीच्या प्रकरणात मदत करणार नसल्याचं अमृता फडणवीस यांनी या मुलीला स्पष्ट सांगितलं व तिचा नंबर ब्लॉक केला. नंबर ब्लॉग केल्यानंतर अज्ञात नंबर वरून व्हिडीओ पाठवण्यात आले. ज्यामध्ये एका बॅगेत पैसे भरल्याचा व्हिडीओ व दुसरी बॅग घर काम करणाऱ्याला महिलेला दिल्याचा व्हिडीओ होता. ही बाब अमृता यांनी मला सांगितल्यानंतर याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी संबंधित आरोपीला जाळ्यात आडकवल्यानंतर त्याने या प्रकरणात काही पोलीस अधिकारी आणि नेत्यांची नावही घेतली असल्याचा दावा फडणवीसांनी केला आहे.

First published:

Tags: Amruta fadnavis, Shivsena, Uddhav Thackeray