• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • जाहीर माफी मागा अन्यथा खटल्याला सामोरे जा, अमृता फडणवीसांचा नवाब मलिकांना इशारा

जाहीर माफी मागा अन्यथा खटल्याला सामोरे जा, अमृता फडणवीसांचा नवाब मलिकांना इशारा

आपल्याविषयीच्या बदनामीकारक (Amruta Fadanvis warns Nawab Malik to apologize or face defamation case) पोस्ट नवाब मलिकांनी 48 तासांत काढून टाकाव्यत आणि जाहीर माफी मागावी किंंवा बदनामीच्या खटल्याला सामोरं जावं, असा इशारा अमृता फडणवीस यांनी दिला आहे

 • Share this:
  मुंबई, 11 नोव्हेंबर: आपल्याविषयीच्या बदनामीकारक (Amruta Fadanvis warns Nawab Malik to apologize or face defamation case) पोस्ट नवाब मलिकांनी 48 तासांत काढून टाकाव्यत आणि जाहीर माफी मागावी किंंवा बदनामीच्या खटल्याला सामोरं जावं, असा इशारा अमृता फडणवीस यांनी दिला आहे. नबाव मलिकांनी फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर (Warning to file case) त्यांनी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला असून मलिक यांनी त्यांच्या खोट्या आरोपांबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली आहे. काय म्हणाल्या फडणवीस? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे गेल्या काही दिवसांपासून आपल्याविषयी आक्षेपार्ह स्वरूपाची ट्विट करत आहेत. वारंवार खुलासा करूनही ते आपल्यावर बिनबुडाचे आणि निराधार आरोप करत आहेत. त्यामुळे हा मलिक यांच्यासाठी अखेरचा इशारा असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुढील 48 तासांत नवाब मलिक यांनी सर्व ट्विट डिलिट करून आपली जाहीर माफी मागावी किंवा बदनामीच्या खटल्याला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. फौजदारी कारवाईचाही इशारा मानहानीच्या खटल्यासोबत फौजदारी कारवाई करण्याचा इशारादेखील अमृता फडणवीस यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक यांच्यात राजकीय संघर्ष सुरू असताना आता त्यात देवेंद्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही मलिकांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. नवाब मलिक यांनी केलेले सर्व आरोप धादांत खोटे असून त्यांना अजूनही ट्विट डिलिट करून माफी मागण्याची संधी देत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र पुढील 48 तासांत तर मलिक यांनी आपल्याबाबतचे ट्विट डिलिट करून जाहीर माफी मागितली नाही, तर मात्र आपण कोर्टात जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. हे वाचा- Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात रंगणार 'पारडं कॅप्टन्सी'चं कॅप्टन्सी टास्क भाजप विरुद्ध मविआ नवाब मलिक विरुद्ध फडणवीस या लढ्याला आता राजकीय रूप आलं आहे. नवाब मलिक योग्य काम करत असल्याची पावती देत राज्य मंत्रीमंडळानं त्यांना पाठिंबा दिला होता. हे काम सुरू ठेवत त्यांनी पुढं जावं, अशी कौतुकाची थाप मुख्यमंत्र्यांनी मारली होती. मात्र आता मलिक यांच्यामागे ससेमिरा लागत असल्याची चिन्हं दिसू लागली आहेत. एकीकडे ईडीनं त्यांच्या मालमत्तांबाबत कारवाई सुरू केली आहे, तर दुसरीकडे अमृता फडणवीस यांनीदेखील त्यांना इशारा दिला आहे. यावर आता नवाब मलिक काय उत्तर देतात, याची उत्सुकता आहे.
  Published by:desk news
  First published: