'वाईट नेत्याला साथ देणे महाराष्ट्राची चूक', अमृता फडणवीसांचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर घणाघात

'वाईट नेत्याला साथ देणे महाराष्ट्राची चूक', अमृता फडणवीसांचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर घणाघात

अमृता फडणवीस यांनी आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 29 डिसेंबर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेना यांच्यातील राजकीय 'वॉर' थांबताना दिसत नाही. कारण अमृता फडणवीस यांनी आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं आहे. 'वाईट नेता मिळणं ही महाराष्ट्राची चूक नाही, पण त्या नेत्यासोबत राहणं ही मात्र चूक आहे,' असा घणाघात अमृता फडणवीस यांनी केला आहे.

अमृता फडणवीस ज्या Axis Bankमध्ये मोठ्या पदावर काम करत होत्या त्या बँकेत तब्बल 2 लाख पोलिसांचे सॅलरी अकाउंट्स (Salary Accounts) आहेत. ती सर्व खाती आता सरकारी मालकीच्या SBIमध्ये वर्ग करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती पुढे आली आहे. या मुद्द्यावरूनच अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

'सरकारने विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवेत. मात्र अशा प्रकारे खाते वळवण्याचा निर्णय घेऊन सरकार मला आणि देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहे,' असा आरोपही अमृता फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे Axis Bank मधील अकाउंट्सबाबत सरकार घेऊ पाहात असलेला निर्णय अमृता फडणवीस यांच्या चांगलाच जिव्हारी लागला असल्याचं दिसत आहे.

फडणवीस-ठाकरे वादाने गाठले टोक

राज्यात सत्तापालट झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेनेमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अमृता फडणवीस यांनी वारंवार थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनेनं त्यावर चोख प्रत्युत्तर दिलं.

'फक्त 'ठाकरे' आडनाव असून सुद्धा कोणी 'ठाकरे' होऊ शकत नाही. फक्त आपलं कुटुंब आणि सत्ता या पलिकडे जाऊन लोकांसाठी प्रमाणिकपणे काम करावं लागतं अशी टीका अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली होती. त्यानंतर राज्यभरात शिवसेनेच्या महिला पदाधिकारी अमृता फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. काही ठिकाणी अमृता फडणवीस यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलनही करण्यात आलं.

First published: December 29, 2019, 9:22 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading