• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • 'बचाना है इन्हें अपना जमाई और..' अमृता फडणवीसांची पुन्हा मलिकांवर टीका

'बचाना है इन्हें अपना जमाई और..' अमृता फडणवीसांची पुन्हा मलिकांवर टीका

'नवाब मलिक हे रोज पत्रकार परिषदा घेत आहे. पण, ते सारखं खोट बोलत असून त्यांना फक्त आपल्या जावयाला वाचवायचं आहे'

'नवाब मलिक हे रोज पत्रकार परिषदा घेत आहे. पण, ते सारखं खोट बोलत असून त्यांना फक्त आपल्या जावयाला वाचवायचं आहे'

'नवाब मलिक हे रोज पत्रकार परिषदा घेत आहे. पण, ते सारखं खोट बोलत असून त्यांना फक्त आपल्या जावयाला वाचवायचं आहे'

 • Share this:
  मुंबई, 09 नोव्हेंबर : मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणावरून (mumbai cruise drug case) भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक  (nawab malik) यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. मलिक यांनी थेट भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आज अमृता फडणवीस (amruta fadanvis) यांनी 'बचाना है इन्हें अपना जमाई और काली कमाई' अशी कविता करत पुन्हा एकदा मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. अमृता फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा ट्वीट करून नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी हिंदीतून बिगडे नवाब असं म्हणत एक कविताच मलिक यांच्यावर केली. 'बिगड़े नवाब ने-प्रेस कॉन्फ़्रेन्स पर प्रेस कॉन्फ़्रेन्स, प्रेस कॉन्फ़्रेन्स पर प्रेस कॉन्फ़्रेन्स, प्रेस कॉन्फ़्रेन्स पर प्रेस कॉन्फ़्रेन्स बुलाई लेकिन हर बार झूठ और मक्कारी की ही बाते हमे सुनाई, लक्ष्य इनका एक ही है, मेरे भाई बचाना है इन्हें अपना जमाई और काली कमाई' अशी टीकाच अमृता फडणवीस यांनी मलिक यांच्यावर केला. नवाब मलिक हे रोज पत्रकार परिषदा घेत आहे. पण, ते सारखं खोट बोलत असून त्यांना फक्त आपल्या जावयाला वाचवायचं आहे, असा आरोपही फडणवीस यांनी केला. याआधीही जेव्हा मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. तेव्हा अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मलिक यांच्यावर हल्लाबोल केला होता. Share Market : शेअर बाजारात आज घसरण; उद्या कशी असेल बाजाराची दिशा? 'आज ही लोक सामजिक कार्यकर्त्यांच्या पाठीमागे लागली आहे. तुम्हाला जे राजकारण करायचे असेल, बिगडे नबाव व्हायचे असेल तर तुम्ही तुमची प्रतिमा सुधारा नाहीतर महाराष्ट्राचं काही खरं नाही, अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली होती. 'माझ्यावर जाणिवपूर्वक आरोप केले जात आहे. आमच्याकडे ना जमिनी आहे, ना साखर कारखाने आहे, त्यामुळे असे आरोप केले जात आहे. बे नकाब नवाब होता हे ते जरूर होतील पण ही वेळेची गोष्ट आहे. काही सूचत नाही, माणसाच्या डोक्यात जेव्हा वाईट विचार येतात त्यामुळे ते असे आरोप करत आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी मलिक यांच्यावर केली होती. काय केला होता मलिक यांनी आरोप? देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत, असा दावा नवाब मलिकांनी केला. जयदीप राणाचा फोटो नवाब मलिक यांनी ट्वीट केला. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis) नदी स्वच्छता मोहीमेविषयी गाणं केलं होतं. त्या गाण्याचा फायनान्स हेड जयदीप राणा (Jaideep Rana) आहे. नदी संरक्षणासाठीचं हे गाणं होतं. या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीसही आणि सुधीर मुनगंटीवार झळकले होते. याच गाण्याचा फायनान्सर हा जयदीप राणा होता, असं नवाब मलिकांनी म्हटलं. देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन सगळा ड्रग्जचे खेळे सुरु असल्याचा खळबळजनक आरोपही नवाब मलिकांनी केला. नीरज गुंडे नामक व्यक्तीचं नाव घेत ते देवेंद्र फडणवीसांच्या काळातील 'वाझे' होते, असा आरोपही नवाब मलिकांनी केला होता.
  Published by:sachin Salve
  First published: