• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • अमृता फडणवीस परत आल्या, Manike Mage Hithe वर धरला ठेका, VIDEO

अमृता फडणवीस परत आल्या, Manike Mage Hithe वर धरला ठेका, VIDEO

या राजकीय वादातून बाहेर पडण्यासाठी अमृता फडणवीस यांनी हे गाणं तयार केलं आहे.

या राजकीय वादातून बाहेर पडण्यासाठी अमृता फडणवीस यांनी हे गाणं तयार केलं आहे.

या राजकीय वादातून बाहेर पडण्यासाठी अमृता फडणवीस यांनी हे गाणं तयार केलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 19 नोव्हेंबर : आपल्या युनिक आवाजामुळे आणि या ना त्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारवर (MVA Government) टीका करणाऱ्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी मी पुन्हा येईन म्हणत आणखी एक गाणे सादर केले आहे. Manike Mage Hithe गाण्याचे हिंदी वर्जनच अमृता फडणवीस यांनी सादर केले आहे. अमृता फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी 'आओ कुछ तूफ़ानी करते है, कल शाम. मी पुन्हा येत आहे !!!' असं म्हणत संकेत दिले होते. त्यामुळे, अमृता फडणवीस नेमकं काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अमृता फडणवीस या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या आरोपांवर काही खुलासा करतील का अशी शंका निर्माण झाली होती. पण, या राजकीय वादातून बाहेर पडण्यासाठी आणि शांत राहण्यासाठी अमृता फडणवीस यांनी हे गाणं तयार केलं आहे.  सध्या instagram, YouTube सगळीकडे हवा आहे Manike Mage Hithe या गाण्यावर अमृता फडणवीस यांनी ठेका धरला. विशेष म्हणजे, हे गाणं  #AnniversarySpecial असल्याचं त्यांनी सांगितलं. मनिके मागे हिथे हे गाणं दाक्षिणात्य भाषेतलं वाटत असलं तरी ते कुठल्याही भारतीय भाषेतलं नाही. ते आहे श्रीलंकन गाणं सिंहली भाषेतलं आहे. या गाण्याचं हिंदी रूप अमृता फडणवीस यांनी सादर केलं आहे. काही दिवसांपूर्वीच दिवाळीच्या निमित्ताने  अमृता फडणवीस यांनी महालक्ष्मी आरती गीत सादर केलं होतं. महालक्ष्मीजी की आरती, जो कोई नर गाता, उर आनंद समाता, पाप उतर जाता ! ॐ जय लक्ष्मी माता! असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्यात लोकप्रिय गायक सोनू निगमची खास उपस्थितीत आहे. या गाण्यातून पहिल्यांदाच अमृता फडणवीस यांनी सोनू निगमसोबत गाणं गायलं आहे. याआधीही अमृता फडणवीस यांची अनेक गाणी आली. गणपती, व्हेलटाईंन डेच्या निमित्ताने त्यांनी अशी गाणी सादर केली आहे.  अमृता फडणवीस त्यांच्या गाण्यांमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. विशेष म्हणजे, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत सुद्धा अमृता फडणवीस यांनी गाणं गायलं आहे. 'फिर से' या गाण्याचं लाँचिंग खुद्द अमिताभ बच्चन यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं होतं.
  Published by:sachin Salve
  First published: