Home /News /mumbai /

अमृता फडणवीस यांनी खुशाल राज्य सोडावे, शिवसेनेच्या मंत्र्यांचा सणसणीत टोला

अमृता फडणवीस यांनी खुशाल राज्य सोडावे, शिवसेनेच्या मंत्र्यांचा सणसणीत टोला

'गेली 5 वर्ष पोलिसांची सुरक्षा घ्यायची आणि त्यांच्यावरच टीका करायची,मुंबईत असं काय घडलं ज्यामुळे त्यांना असुरक्षित वाटत आहे?'

    मुंबई, 04 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी अमृता फडणवीस यांना राज्य सोडून जाण्याचा सल्ला दिला आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर होत असलेल्या आरोप प्रत्यारोपावरून भाजपवर सडकून टीका केली आहे. 'मागे 5 वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार होते. फडणवीस हे राज्याचे गृहमंत्रीही होते. त्यामुळे सरकार बदलले म्हणजे पोलीस बदलले असं होत नाही. ज्या पोलिसांची पाच वर्ष सुरक्षा घेतली त्या पोलिसांवरच जर संशय घेत असाल तर अमृता फडणवीस यांनी खुशाल राज्य सोडून जावं' असा सणसणीत टोला परब यांनी लगावला आहे. मुंबई पोलिसांवर बोट ठेवणाऱ्या अमृता फडणवीसांना रेणुका शहाणेंनी चांगलेच झापले 'गेली 5 वर्ष पोलिसांची सुरक्षा घ्यायची आणि त्यांच्यावरच टीका करायची असेल तर त्यांनी राज्य सोडून जाणे हाच योग्य पर्याय आहे. मुंबईत असं काय घडलं ज्यामुळे त्यांना असुरक्षित वाटत आहे? आजही अमृता फडणवीस पोलिसांचीच सुरक्षा घेऊन फिरत आहे' अशी आठवणही परब यांनी करून दिली. 'बिहार पोलिसांकडून हस्तक्षेप केला जात आहे, हे बिहारमधील आगामी निवडणुकीसाठी राजकारण आहे. खुर्ची मिळवण्यासाठी तडफड दिसून येत आहे'  असा टोलाही परब यांनी भाजपला लगावला. 'सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास करण्यात मुंबई पोलीस सक्षम आहे. सीबीआयची कुणीही मागणी केली तर तपास त्यांच्याकडे देता येत नाही. सीबीआयला याची कारण द्यावी लागता, त्यानंतर तपास दिला जात असतो. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थितीत केले जात आहे. गेल्या 5 वर्षा किती आत्महत्या झाल्या, किती हत्याकांड झाले आहे आणि त्यांचा  तपास सीबीआयकडे दिला आहे. जे आहे ते समोर येऊ द्या, असं थेट आव्हानच परब यांनी फडणवीसांना दिले आहे. मुंबईत 'ज्या' ठिकाणी कोसळली दरड, तिथेच महावितरणच्या टॉवरमुळे वाढली भीती, PHOTOS 'नितीशकुमार हे महाराष्ट्र राज्य पोलिसांचे प्रमुख नाही. त्यांच्या राज्यात काय चालले आहे त्यावर त्यांनी बोलले पाहिजे. बिहारच्या राजकारणासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे. महाराष्ट्र पोलिसांना काही सांगण्याची गरज नाही. मुंबई पोलीस व्यवस्थितीत तपास करत आहे. ते सक्षम असून सरकार पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी आहे' अशा शब्दात नितीशकुमारांना टोला लगावला आहे. 'आदित्य ठाकरे यांच्यावर विनाकारण आरोप केले जात आहे.  मुख्यमंत्र्यांची प्रतिमा ही चांगली आहे. त्यांची प्रतिमा मलीन करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. गोंध्रा हत्याकांड, सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणातही अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप झाले होते. अमित शहा यांना कारागृहात जावं लागलं, अशा आरोपचं हे तंत्र  आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत केलं जातं आहे. कालांतराने ते निर्दोष सुटले. अशाच आरोपांचे षड्यंत्र आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत रचले जात आहे' असा पलटवारही अनिल परब यांनी भाजपवर केला.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Shivsena, अनिल परब, अमृता फडणवीस, शिवसेना

    पुढील बातम्या