मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /अमृता फडणवीस यांचा विद्या चव्हाणांवर जोरदार पलटवार, अब्रुनुकसानीचा केला दावा दाखल

अमृता फडणवीस यांचा विद्या चव्हाणांवर जोरदार पलटवार, अब्रुनुकसानीचा केला दावा दाखल

विद्याताई चव्हाण यांनी अमृता फडणवीस यांचा उल्लेख डान्सिंग डॉल केला होता. त्यामुळे अमृता फडणवीस कमालीच्या संतापल्या आहे

विद्याताई चव्हाण यांनी अमृता फडणवीस यांचा उल्लेख डान्सिंग डॉल केला होता. त्यामुळे अमृता फडणवीस कमालीच्या संतापल्या आहे

विद्याताई चव्हाण यांनी अमृता फडणवीस यांचा उल्लेख डान्सिंग डॉल केला होता. त्यामुळे अमृता फडणवीस कमालीच्या संतापल्या आहे

मुंबई, 07 जानेवारी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (rashmi thackery) यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्वीट प्रकरणावरून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (amruta fadanvis) आणि राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण (vidya chavan)  यांच्यात वाद पेटला आहे. आता हा वाद कोर्टात पोहोचला असून अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या विद्याताई चव्हाण यांनी अमृता फडणवीस यांचा उल्लेख डान्सिंग डॉल केला होता. त्यामुळे अमृता फडणवीस कमालीच्या संतापल्या आहे. अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांच्या घरातील गृहकलह बाहेर काढत ऐकरी भाषेत हल्ला चढवला आहे.

'आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे राष्ट्रवादीची नेता विद्याहीन चव्हाण,आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल,तिने पसरविलेली सगळी विषारी घाण ! विद्या चव्हाण मानहानी notice वाच आणि सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण!' असा इशाराच फडणवीस यांनी दिला आहे.

अमृता फडणवीस यांनी थेट विद्या चव्हाणांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. हा मानहानीचा दावा असून त्याबबतचा खुलासा कोर्टातच करावा, असे या नोटीसमध्ये म्हटलं आहे.

काय म्हणाल्या होत्या विद्या चव्हाण?

'रश्मी ठाकरे यांना राबडी देवी यांची उपमा दिली हे बरं झालं. जर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीला उपमा दिली असती तर डान्सिंग डॉल अशी प्रतिमा झाली असती. निदान रश्मी ठाकरे यांची व्हाईट प्रतिमा नाही आहे हे तरी मला या ठिकाणी भाजपवाल्यांना सांगावं वाटतं. दुसऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बायको तक्रार करताना तुमच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे काय काय गुण उधळले त्या विषयी जर ट्वीट केले तर बरे होईल, असं विद्या चव्हाण म्हणाल्या होत्या.

First published: