पुणे, 24 जानेवारी : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वावादीची भूमिका हाती घेतल्यानंतर भाजपकडून स्वागत केलं जात आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही राज ठाकरे यांच्या या भूमिकेचं कौतुक करत पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं आहे.
मनसेच्या पहिल्या महाअधिवेशनामध्ये राज ठाकरे यांनी 'मी मराठी असलो तरी हिंदू आहे', असं म्हणत हिंदुत्त्वाची भूमिका जाहीर केली. त्यांच्या भूमिकेवर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेला टोला लगावला आहे.
राज ठाकरे हे आपल्या पक्षाला नवीन दिशा देत आहे. हे पाहून मला याच कौतुक वाटतंय. ते खूप चांगलं काम करतील, अशी स्तुती अमृता फडणवीस यांनी केली.
तसंच, 'माझ्या सारख्या शिवसैनिकाला खऱ्या नेत्याची गरज आहे. अशा नेत्याला आपण सगळे फॉलो करण्याची गरज असते, त्यामुळे आता आपल्याला खऱ्या नेत्याची खूप गरज आहे', असं म्हणत अमृता फडणवीस यांनी सेनेला टोला लगावला.
पवारांची सुरक्षा काढून घेण्याची अफवा
पत्रकारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सुरक्षा काढण्यात आली याबद्दल प्रश्नविचारला असता, 'अमृता फडणवीस म्हणाल्या की, शरद पवार यांची सुरक्षा काढून घेतल्याबाबत अफवा पसरवली जात असेल. यामध्ये काही तथ्यही नसेल असं वाटत आहे'
मुंबईत महिला सुरक्षित
तसंच, आदित्य ठाकरे यांनी मुंबई नाईट लाईफची घोषणा केली आहे. मुंबईत नाईट लाईफविषयी अजून काही विचार केलेला नाही. यात सुरक्षा कशी घेतली जाईल. याबद्दल विचार करावा लागेल. परंतु, मुंबईत महिला सर्वात सुरक्षित आहे. अनेक महिला काम करत आहे. त्यांची सुरुक्षित याचा अभिमान आहे, असंही अमृता म्हणाल्या.
'फोन टॅपिंगच्या आरोपात तथ्य नाही'
फडणवीस सरकारच्या काळात शरद पवार आणि सेनेच्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते. या प्रकरणी अमृता यांनी देवेंद्र यांची पाठराखण करत सेनेवर टीका केली. मुळात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला भाजपला बाजूला हटवायचं होतं. त्यासाठी ते एकत्र आहे. ज्यावेळी फोन टॅप केले गेले होते, तेव्हा शिवसेनाही भाजपसोबत होती मग चौकशी केली पाहिजे. त्यामुळे या प्रकरणामध्ये काही तथ्य आहे का? की अफवा आहे, हे पाहावं लागेल. असं अमृता यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस घरी वेळ देता का?
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडून घरी वेळ दिला जात नव्हता, अशी तक्रार अमृता यांनी अनेक कार्यक्रमातून बोलून दाखवली होती. पत्रकारांनी आता देवेंद्र फडणवीस हे वेळ देता का? असा सवाल केला असता अमृता फडणवीस म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस हे लोकनेते आहे. ते मुख्यमंत्रिपदी असतानाही लोकनेते होते, त्यावेळी त्यांना राज्य प्रथम होतं. आता ते विरोधी पक्षनेते असले तरी ते लोकनेते आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला वेळ दिला किंवा नाही दिला तरी आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत.'