Home /News /mumbai /

Why I Killed Gandhi: अमोल कोल्हे यांच्या नथुराम भूमिकेवरुन वाद; कोल्हेंचं समर्थन करत शरद पवार भाजपला म्हणाले...

Why I Killed Gandhi: अमोल कोल्हे यांच्या नथुराम भूमिकेवरुन वाद; कोल्हेंचं समर्थन करत शरद पवार भाजपला म्हणाले...

अमोल कोल्हे यांच्या नथुराम भूमिकेच्या वादावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

अमोल कोल्हे यांच्या नथुराम भूमिकेच्या वादावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

Sharad Pawar reaction on Amol Kolhe played Nathuram Godse character in movie: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत आगामी सिनेमात दिसणार आहेत. यावरुन विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

    मुंबई, 21 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी Why I Killed Gandhi या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका (Nathuram Godse Character) साकरली आहे. या भूमिकेवरुन चांगलाच वाद निर्माण झाला आहे. अमोल कोल्हे खासदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांनीही त्यांच्यावर निशाणा साधत घरचा आहेर दिलाय. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी या वादावर भाष्य करत आपली आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवारांकडून अमोल कोल्हेंचं समर्थन अमोल कोल्हे यांनी साकारलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेवर निर्माण झालेल्या वादावर शरद पवारांना विचारले असता त्यांनी म्हटलं, अमोल कोल्हे यांनी एक कलाकार म्हणून भूमिका केली आहे. गांधी सिनेमा गाजला आणि त्या सिनेमात सुद्धा नथुराम गोडसेची भूमिका करणारा हा कलाकारच होता. वाचा : Why I Killed Gandhi : अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ सर्वच कलाकारांचा सन्मान करतो शरद पवार पुढे म्हणाले, गांधी यांच्यावरचा जो सिनेमा प्रसिद्ध झाला होता, नाव मला आठवत नाही. तो सिनेमा संपूर्ण जगात गाजला. त्या सिनेमात सुद्धा कुणीतरी नथुराम गोडसेंची भूमिका केली होती. ती भूमिका करणाराही कलाकार होता तो काही नथुराम गोडसे नव्हता. कुठल्याही सिनेमात कलाकार एखादी भूमिका घेत असेल तर कलाकार म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. कलावंत म्हणून मी सर्वच कलाकारांचा सन्मान करतो. राजे शिवाजी महाराजांच्या सिनेमात कुणी शिवाजी महाराजांची भूमिका करत असेल आणि कुणी तरी औरंगजेबची भूमिका साकारात असेल तर तो काय लगेच मुघल साम्राज्याचा पुरस्कर्ता होत नाही. तो कलाकार म्हणून ती भूमिका घेतो. यासारखंच राम आणि रावणाचा संघर्ष दाखवणाऱ्या सिनेमात रावणाची भूमिका साकारणारा व्यक्ती रावण असू शकत नाही किंवा सीतेचं अपहरण केलं तर त्या कलाकाराने अपहरण केलं असं नाही. रावणाचा इतिहास दाखवण्याचा तो कलाकाराचा प्रयत्न असतो. वाचा : 'कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करु शकत नाही', आव्हाडांचा रोखठोक टोला भूमिका ही कलावंत म्हणून त्याच प्रमाणे अमोल कोल्हेंनी केलेली भूमिका ही कलावंत म्हणून केली आहे. मला माहिती आहे की, अमोल कोल्हे यांनी ज्यावेळी भूमिका केली, 2017 साली केली त्यावेळी ते आमच्या पक्षातही नव्हते. कलावंत म्हणून त्यांनी ती भूमिका केली असेल याचा अर्थ त्यांनी गांधींविरोधात भूमिका केली असा होत नाही असंही शरद पवार म्हणाले. भाजप हे गांधीवादी कधीपासून झाले? भारतीय जनता पक्षाचा आणि संघाचा इतिहास सर्वांना माहिती आहे. त्यावर मला भाष्य करायचं नाहीये. एक काळ असा होता की, गांधींबाबत वेगळी भूमिका घेणाऱ्या ज्या शक्ती होत्या त्या शक्ती सध्या कुठे आहेत हे पाहिलं पाहिजे असंही शरद पवार म्हणाले.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Mahatma gandhi, NCP, Sharad pawar

    पुढील बातम्या