शिवसेनेला जय महाराष्ट्र! अमोल कोल्हेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

शिवसेनेला जय महाराष्ट्र! अमोल कोल्हेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेता अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

  • Share this:

मुंबई, 1 मार्च : अभिनेते अमोल कोल्हे यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.

स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेता अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, अशी माहिती याआधीच सूत्रांकडून मिळाली होती. आता अखेर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थित कोल्हे यांचा पक्षप्रवेश झाला आहे.

लोकसभा लढवण्याची शक्यता

आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. . अमोल कोल्हे हे याआधी शिवसेनेत आहे. त्यामुळे हा शिवसेनेला धक्का मानला जात आहे.

काही दिवसांआधी पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे संभाव्य उमेदवार आणि संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी बारामतीमधील गोविंद बाग इथल्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी अभिनेते अमोल कोल्हे हेदेखील त्यांच्यासोबत होते.

या दोघांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. पण ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आलं. परंतु, आता अमोल कोल्हे राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत.

VIDEO : शिवसेना राष्ट्रवादीत तुफान राडा; शेकडो कार्यकर्ते भिडले, गाड्यांची तोडफोड

First Published: Mar 1, 2019 03:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading