मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /अमोल कोल्हेंनी का मारली बैठकीला दांडी? अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

अमोल कोल्हेंनी का मारली बैठकीला दांडी? अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या बैठकांना गैरहजर राहत आहे. त्यामुळे

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या बैठकांना गैरहजर राहत आहे. त्यामुळे

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या बैठकांना गैरहजर राहत आहे. त्यामुळे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 10 जानेवारी : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या बैठकांना गैरहजर राहत आहे. त्यामुळे कोल्हे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. आज सुद्धा मुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीला कोल्हे आले नाही. पण, त्यांची नाटकं सुरू आहे, त्यामध्ये ते व्यस्त आहे, त्यमुळे ते येऊ शकले नाही, असा खुलासा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला.

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक उमेदवार निवडसाठी राष्ट्रवादीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील सहीत अनेक नेते उपस्थित होते. पण, या बैठकीला अमोल कोल्हे गैरहजर होते.

(Shivsena Vs Shinde : सत्तासंघर्षावर पुन्हा तारीख पे तारीख, पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला)

अमोल कोल्हे हे पक्षाचे खासदार आहे, तसंच ते अभिनेते सुद्धा आहे. सध्या नाटकांच्या निमित्ताने त्यांचे दौरे सुरू आहे. त्यामुळे ते येऊ शकले नाही, अशी माहिती अजितदादांनी दिली.

राज्यातील अनेक महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे. पुरोगामी विचार घेऊन पुढे जाणारा पक्ष आहे. घटना, नियम कायदा अनुसार चालणारा पक्ष आहे. भाजप नुसतं बावो करत आहे. भाजप अपप्रचार करत आहे. आमच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करत असतील तर आम्ही मुंग गिळून बसलो नाही. आम्ही पण खोटे गुन्हे दाखल करू शकतो. विनयभंग गुन्हे केले, विरोधकांना त्रास देण्याकरिता कुणाला अडकवण्याचा प्रयत्न करत असतील तर सहन करणार नाही.जितेंद्र आव्हाड दोन गुन्हे दाखल केले होते. जर चुका असतील त्यावर कारवाई करावी.

पण मुद्दाम कुणाला उभं करून केस टाकले ही राज्याची परंपरा नाही. आमच्या काळात सत्तेत असताना असे केलं नाही. आता असं कोणी केले आम्ही सहन करणार नाही, असंही अजित पवारांनी ठणकावून सांगितल.

(Shivsena Vs Shinde : 'सगळं प्रेमाने होईल', 14 तारखेच्या सुनावणीवर संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया)

'तारीख पे तारीख होणार आहे. सहा महिने तारखा सुरू आहे. शेवटी कोर्टामध्ये हा निर्णय आहे. जो काही निर्णय लागेल, त्याची आम्हीही वाट पाहतोय, अशी प्रतिक्रियाही अजितदादांनी दिली.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर बलात्कार केस टाकली तर मुघलाशी येईल. महाराष्ट्र शांत बसणार नाही. इतक्या खालच्या पातळीवर राज्याचे राजकारण जाणार असेल तर आम्हाला वेगवेगळे आयुध वापर करू आम्ही मूग गिळून बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

जाती निहाय जनगणना व्हावी अशी आम्ही भूमिका मांडली आहे. केंद्राने प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ७० हजार चुका आहेत. केंद्र माहिती देत नाही. सगळ्यांना कळले पाहिजे नेमकी लोकसंख्या किती सरकारला अर्थसंकल्पात न्याय देताना उपयोग होईल म्हणून जाती निहाय जनगणना समर्थन आहे, असंही पवार म्हणाले.

First published:

Tags: NCP, अजित पवार