महाराष्ट्रात 48 खासदार आहेत. जर त्यांना त्यांच्या मतदारसंघासाठीचा निधी दिला तर त्यांना संपूर्ण राज्यभरात या माध्यमातून मोठी आरोग्य सुविधा उभी करता येऊ शकते. गरज असेल त्यानुसार जम्बो कोविड सेंटर, ऑक्सिजन प्लांट यासाठी हा निधी लोकप्रतिनिधी वापरू शकतील. त्याद्वारे आरोग्य व्यवस्था बळकट करता येईल असं कोल्हेंनी म्हटलं आहे. पंतप्रधानांकडे तशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. आजच्या घडीला संसद भवन किंवा इतर गोष्टींपेक्षा माणसं वाचवणं गरजेचं आहे. त्यामुळं हा निधी देण्याची मागणी कोल्हेंनी केली. कोल्हेंनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर यापूर्वीदेखिल संसदभवन किंवा इतर गोष्टींपेक्षा आरोग्य व्सवस्था बळकट करण्याची मागणी केलेला व्हिडिओदेखिल शेअर केला आहे.खासदारकीचा निधी मिळावा यासाठी अमोल कोल्हेंनी पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र..पाहा काय म्हणतायेत... pic.twitter.com/DLbf8eFbka
— News18Lokmat (@News18lokmat) April 26, 2021
राज्य सरकारचं कौतुक महाराष्ट्र सरकारनं सर्व आमदारांना त्यांच्या आमदार निधीपैकी 1 कोटी रुपयांचा निधी कोविडच्या कामांसाठी वापरण्याची परवानगी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचं अमोल कोल्हेंनी कौतुक केलं. अशाच प्रकारचा निर्णय केंद्रानं घेतल्यास लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघांमध्ये कामं करता येईल असं कोल्हे म्हणाले. (वाचा-मुंबईला सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची दुरावस्था; जागा नाही म्हणून ST वर मुक्काम) केंद्र सरकार आणि विरोधी पक्षातील नेते विविध मुद्द्यांवरून सध्या आमने-सामने उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात अमोल कोल्हे यांनी आता पुन्हा एकदा खासदार निधीचा मुद्दा उपस्थित केल्यानं यावरून आता परत नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.आता तरी पटतंय ना ? ज्या देशाच्या आरोग्यव्यवस्थेच्या मर्यादा कोरोनामुळे उघड्या पडल्या तिथं काय पाहिजे? नवं संसदभवन की सुसज्ज हॉस्पीटल ? आंधळी भक्ती आणि व्यक्तीपूजेपेक्षा देशातील नागरिकांचे आरोग्य आणि हित सर्वाधिक महत्वाचं आहे.#PMOIndia#IndiaFightsCorona#COVIDSecondWaveInIndia pic.twitter.com/4ZZgWJUB6q
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) April 20, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Central government, Coronavirus