मातृदिनानिमित्त बिग बींनी मानले आईचे आभार

मातृदिनानिमित्त बिग बींनी मानले आईचे आभार

अमिताभ बच्चन यांनी मदर्स डे निमित्त आपल्या आईसोबतचे दोन फोटो ट्विट केलेत, आणि आई-मुलाच्या सुंदर नात्याबाबत 2 ओळीही लिहिल्या आहेत.

  • Share this:

13 मे : अमिताभ बच्चन यांनी मदर्स डे निमित्त आपल्या आईसोबतचे दोन फोटो ट्विट केलेत, आणि आई-मुलाच्या सुंदर नात्याबाबत 2 ओळीही लिहिल्या आहेत. मी माझ्या आणि सर्व आयांचे आभार मानते, असं बिग बी म्हणालेत.

अमिताभ यांच्या मातोश्री तेजी बच्चन अनेक वर्षं अमिताभ यांच्या घराजवळच रहायच्या. प्रतीक्षा बंगल्यात त्यांचं वास्तव्य होतं. 2007 साली वयाच्या 93व्या वर्षी तेजी बच्चन यांचं निधन झालं.

1940च्या दशकात हरिवंशराय यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांनी नाटकांमध्ये अभिनय केला, सामाजिक कार्य केलं, तसंच त्या इंदिरा गांधींच्या निकटवर्तीय मानल्या जायच्या.

 

First published: May 13, 2018, 5:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading