राज ठाकरेंच्या लग्नाच्या वाढदिवसालाच अमित-मितालीचा साखरपुडा संपन्न

राज ठाकरेंच्या लग्नाच्या वाढदिवसालाच अमित-मितालीचा साखरपुडा संपन्न

फॅशन डिझायनर मिताली बोरुडेशी अमितचा साखरपुडा झाला आहे. हा सोहळा मुंबईतच अगदी खाजगी स्वरूपात पार पडला आहे. योगायोग म्हणजे राज ठाकरे यांचा 11 डिसेंबर हा लग्नाचा वाढदिवस. त्याच दिवशी अमितचा साखरपुडा झालाय. अमित आणि मिताली यांची मैत्री खूप जुनी आहे.

  • Share this:

11 डिसेंबर : राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे याचा आणि मिताली बोरूडेचा साखरपुडा संपन्न झाला आहे . महालक्ष्मीच्या टर्फ क्लबवरहा साखरपडा संपन्न झाला आहे.फॅशन डिझायनर मिताली बोरुडेशी अमितचा साखरपुडा झाला आहे. हा सोहळा मुंबईतच अगदी खाजगी स्वरूपात पार पडला आहे.

योगायोग म्हणजे राज ठाकरे यांचा 11 डिसेंबर हा लग्नाचा वाढदिवस. त्याच दिवशी अमितचा साखरपुडा झालाय. अमित आणि मिताली यांची मैत्री खूप जुनी आहे. आणि आता त्या मैत्रीचं रूपांतर सुंदर नात्यात होतंय. मिताली या मुंबईतले सुप्रसिद्ध डॉक्टर संजय बोरुडे यांची कन्या आहेत. मिताली फॅशन डिझायनर आहे.शिवाय ती उर्वशी राज ठाकरे यांच्याबरोबरही काम करतात.

एकूणच राजकारणी आणि त्यांच्या आयुष्यातल्या घडामोडींबद्दल जनतेला नेहमीच उत्सुकता आहे. शिवाय अमित नुकताच मोठ्या आजारातून बरा झालाय, त्यामुळे या बातमीनं सगळ्यांनाच आनंद झालाय. राज ठाकरेंचीही आता नवी इनिंग सुरू होतेय. ते सासरे होतायत.

आज राज ठाकरे यांची मनसे कार्यकर्त्यांनी भेट घेतली. त्यावेळी तिथे मितालीला पाहिलं आणि तिच्या हातावर मेंदी होती. त्यामुळेच या बातमीला दुजोरा मिळतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2017 01:44 PM IST

ताज्या बातम्या