PPE कीट नंतर अमित ठाकरेंची डॉक्टरांना अशीही मदत

PPE कीट नंतर अमित ठाकरेंची डॉक्टरांना अशीही मदत

  • Share this:

मुंबई, 03 मे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे राजकारणात सक्रीय झाल्यापासून सामजिक कार्यात पुढाकार घेत आहे. कोरोनाविरोधात लढा देणाऱ्या डॉक्टरांना पीपीई कीट आणि मास्क वाटप केल्यानंतर आता अमित ठाकरे यांनी डॉक्टरांना आणखी मदत केली आहे.

मनसेचे नेते अमित राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील डॉक्टरांसाठी हायप्रोटीन्स युक्त खाद्य पदार्थ डॉक्टरांची नामांकित संस्था असलेल्या मार्डचे अध्यक्ष श्री.राहल वाघ आणि त्यांच्या टीमकडे स्वाधीन केले आहे.

हेही वाचा - भाजप नगरसेविकेची कमाल, परप्रांतीयांसाठी कार्यालयातच बसवले डॉक्टर

रुग्णाची कोरोना विषाणूची तपासणी करताना डॉक्टरांनी पीपीई किटस् चढवली की, 8-10 तास काहीही खाता येत नाही, त्यामुळे यावेळी काम करत असताना  डॉक्टरांना हाय प्रोटीन्सची खूप गरज असते.

ही गोष्ट जेव्हा मनसे नेते अमित ठाकरे यांना समजताच त्यांनी 4 हजार प्रोटिन्सयुक्त खाद्य पदार्थाचे पॅकेट आज सरकारी निवासी डॉक्टरांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहे.

हेही वाचा - श्रेयस तळपदेला नक्की काय झालंय? एका डोळ्याला पट्टी पाहून चाहते चिंतेत

याआधी अमित ठाकरे यांनी महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी 1000 पीपीई किट्स आणि मास्क डॉक्टरांच्या 'मार्ड' संघटनेकडे सुपूर्द केले होते. त्यांच्या या मदतीबद्दल  मार्डने अमितचे आभार मानले. पण, 'हे डॉक्टर्स जसं जीवावर उदार होऊन महाराष्ट्राची सेवा करत आहेत त्याबद्दल माझं कुटुंबच या डॉक्टरांचे आभार मानू इच्छितो', अशी भावना अमित ठाकरे यांनी व्यक्त केली होती.

संपादन - सचिन साळवे

First published: May 3, 2020, 3:32 PM IST

ताज्या बातम्या