Home /News /mumbai /

BREAKING : अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण, लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल

BREAKING : अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण, लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल

अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण (Amit Thackeray corona test positive) झाल्याचे समोर आले आहे. त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

    मुंबई, 20 एप्रिल : मनसेचे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांचे चिरंजिव आणि मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Raj Thackeray) यांना कोरोनाची (corona Positive) लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये (Lilavati hospital mumbai ) दाखल करण्यात आले आहे. अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून तातडीने लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घरातील इतर सदस्यांना संसर्ग होऊ नये म्हणून तातडीने हा निर्णय घेण्यात आल्याचे कळत आहे. अमिताभ बच्चन यांनी बाबिलला दिल्या बॉलिवूड पदार्पणासाठी शुभेच्छा; म्हणाले... याआधी सुद्धा ऑक्टोबर 2020 मध्ये अमित ठाकरे यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यामुळे त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, अमित ठाकरे यांची कोरोनाची चाचणी ही निगेटीव्ह आली होती. व्हायरल  फिव्हर झाल्यामुळे खबरदारी म्हणून  त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. भारतात कोरोना लशींचा अपव्यय; मोठ्या प्रमाणात लशींचे डोस वाया तर दुसरीकडे मागील आठवड्यात राज ठाकरे यांना सुद्धा लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल  करण्यात आले होते. राज ठाकरे यांना पाठीचा त्रास होत असल्यामुळे मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या