अमित ठाकरे यांना लीलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, ‘कृष्णकुंज’वर परतले

अमित ठाकरे यांना लीलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, ‘कृष्णकुंज’वर परतले

काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना बरं वाटू लागल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली आणि आराम करण्याचा सल्ला दिला.

  • Share this:

मुंबई 22 ऑक्टोबर: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Raj Thackeray) यांना लीलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात देण्यात आला आहे. हॉस्पिटलमधून ते घरी परतले आहेत. ताप येत आसल्याने शनिवारी रात्री त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाची साथ असल्याने खबरदारी म्हणून त्यांची कोविड स्टेस्टही करण्यात आली होती. सुदैवाने ती टेस्ट निगेटिव्ह आल्याने चिंतेच कारण नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं.

काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना बरं वाटू लागल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली आणि आराम करण्याचा सल्ला दिला. मसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही लीलावतीमध्ये जावून अमितची भेट घेतली होती.

अमित यांच्या मलेरिया आणि इतरही चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यांचेही रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. व्हायरल फिव्हर असल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली होती. कोरोनाच्या काळात खबरदारी म्हणून पुढील दोन ते तीन दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आले होते.

कोरोनाच्या परिस्थितीत काळजी घेणे गरजेचं आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस त्यांना निगराणीखाली ठेवण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. योग्य त्या उपचारानंतर अमित ठाकरे यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.

बिहारकरता भाजपचं घोषणापत्र, सत्तेत येताच देणार कोरोनाची मोफत लस

अमित ठाकरे यांच्यावर पक्षात मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानंतर राजकारणात ते सक्रीय झाले आहे. कोरोनाच्या काळात अमित ठाकरे यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर मदत कार्य केले. आशा सेविकांचा प्रश्न असेल, डॉक्टरांनी फूट पॅकेटचे वाटप असेल, अशा अनेक मुद्यांवर अमित यांनी काम पाहिले होते.

अमित हे सध्या अनेक प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेत आहेत. अलीकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील 800 एकर भाग हा जंगल म्हणून घोषित केला आहे. त्याचबरोबर आरेतील मेट्रोचे कारशेड हे कांजूरमार्गला हलवण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाबद्दल अमित यांनी आभार मानले होते. 'हा लोकांच्या संघर्षाचा विजय आहे.

प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीत अभियान; महाराष्ट्र सरकार धडा घेणार का?

मी समजू शकतो आरे कारशेडसाठी आंदोलन करणारी लोकं किती आनंदी असतील. अनेकांनी आंदोलन करताना अंगावर केसेस घेतल्या होत्या. त्या सगळ्यांच्या लढ्याला यश आलं आहे', असं म्हणत अमित ठाकरे यांनी ठाकरे सरकारचे आभार मानले होते. या प्रश्नावर त्यांनी आंदोलनही केलं होतं.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 22, 2020, 2:34 PM IST

ताज्या बातम्या