PHOTOS : राज ठाकरेंच्या पावलावर अमित ठाकरेंचं पाऊल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे हे लवकरच राजकारणात सक्रिय होणार अशा चर्चा सुरू आहेत.

  • Share this:

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे हे लवकरच राजकारणात सक्रिय होणार अशा चर्चा सुरू आहेत. त्यातच आता अमित यांनी राज ठाकरेंच्या पावलावर पाऊल टाकत समाजसेवेसाठी लोकांच्या भेटीगाठी करण्यास सुरुवात केली आहे.

अमित ठाकरे यांनी शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम डोळखांब भागातील गांडुळवाडी येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळेला भेट दिली.

शाळेतल्या विद्यार्थ्यांसोबत काही क्षण त्यांनी आनंदात घालवले. त्यांच्याशी गप्पा-गोष्टी करत अगदी डान्सही केला.

बरं इतकंच नाही तर आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत पंगतीला बसत त्यांनी जेवणाचा आस्वादही घेतला. हा साधेपणा जसा राज ठाकरेंच्या अंगी आहे अगदी हुबेहूब तो अमित ठाकरे यांनी टिपला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मंडप बांधण्यावरून अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची चर्चादेखील केली होती. उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे खुद्द बाळासाहेब ठाकरे असतानाच राजकारणात उतरले. ते आता युवा सेनेचे अध्यक्ष आहेत.

आदित्य ठाकरे यांची राजकारणातली एन्ट्री दमदार होती. अशीच दमदार एन्ट्री अमित ठाकरे यांची व्हावी असं मनसे कार्यकर्त्यांना वाटतं.

त्यात आता अमित यांचा शहापूर दौरा भारीच झाला. त्यामुळे अमित ठाकरेंची एन्ट्रीदेखील जबराट होईल यात काही शंका नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2018 12:04 PM IST

ताज्या बातम्या