Home /News /mumbai /

अमित शहांची थोड्याच वेळात ‘News18’वर Exclusive मुलाखत, सर्व देशाचं लागलं लक्ष!

अमित शहांची थोड्याच वेळात ‘News18’वर Exclusive मुलाखत, सर्व देशाचं लागलं लक्ष!

**EDS: VIDEO GRAB** New Delhi: Union Home Minister Amit Shah looks on during Prime Minister Narendra Modi's (unseen) interaction with the Chief Ministers of various States/UTs via video conferencing to discuss the situation arising due to the novel coronavirus pandemic, in New Delhi, Monday, April 27, 2020. (TV GRAB/PTI Photo) (PTI27-04-2020_000063B)

सध्याच्या देशातल्या परिस्थितीवर आणि महाराष्ट्रातल्या राजकारणावर ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

    मुंबई 1 जून: देशात असलेलं कोरोनाचं संकट, केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारची वर्षपूर्ती या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याची ‘News18’ वर Exclusive मुलाखत होणार आहे. Network18चे समुह संपादक राहुल जोशी हे अमित शहांची मुलाखत घेणार आहेत. नरेंद्र मोदी सरकारमध्ये शहा यांचं स्थान हे सर्वात महत्त्वाचं समजलं जातं. त्यामुळे सध्याच्या देशातल्या परिस्थितीवर आणि महाराष्ट्रातल्या राजकारणावर ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये सत्तेवर येताच अमित शहांनी अनेक धाडसी निर्णय घेत भाजपच्या अजेंड्यातले अनेक निर्णय प्रत्यक्षात आणले. काश्मीरमधून 370वं कलम हटवणं, शेजारच्या देशातून भारतात आलेल्या अल्पसंख्याक लोकांना भारताचं नागरिकत्व देणं, राम मंदिराचा प्रश्न मार्गी लावणं असे धाडसी निर्णय त्यांनी घेतले. त्यावरून देशभर वादळ निर्माण झालं. मात्र त्यांनी कठोरपणे त्याची अंमलबजावणी केली. सध्या कोरोनाचं भयाण संकट देशात आहे. दोन महिन्यांपासून असलेला लॉकडाऊनमध्ये सुट देण्यात आली आहे. मजुरांचा प्रश्न, महाराष्ट्रातलं राजकारण असे अनेक विषय असून त्यावर अमित शहा काय बोलणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Amit Shah

    पुढील बातम्या