अमित शहांची उद्धव ठाकरेंना 'ही' आॅफर, 'मातोश्री'वरील बैठकीचे 12 मुद्दे

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 6, 2018 11:51 PM IST

अमित शहांची उद्धव ठाकरेंना 'ही' आॅफर, 'मातोश्री'वरील बैठकीचे 12 मुद्दे

मुंबई,06 जून : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन तास मॅरेथाॅन बैठक पार पडली.  'मातोश्री'वर झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या बैठकीतील महत्वाचे मुद्दे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,

१) शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचा ५०-५० चा फार्म्युला

२) भाजपच्या या प्रस्तावावर शिवसेनेनं कोणतीच भूमिका घेतलेली नाहीये.

३) केंद्रीय आणि राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा झाली.

Loading...

४) अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना गेल्या ४ वर्षातील कामांचा अहवाल सांगितला

५) उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना गेल्या ४ वर्षात भाजपने कशी वागणूक दिली त्याची सविस्तर माहीती दिली.

६) शिवसेना खासदार, आमदार आणि मंत्री यांची भाजपने कशी कोंडी केली याचीही माहिती दिली

७) केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी असुनही शिवसेना विरोधकासारखी वागली. तर भाजपने शिवसेनेला कधीच सन्मान दिला नाही

८) दोन्ही पक्षातील तणाव कमी करण्यासाठी दर तीन महिन्यात दोन्ही पक्षातील नेत्यांच्या बैठका होणार

९) अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची आणखी एक भेट येत्या काही दिवसात होणार

१०) 'मातोश्री'वरील बैठक सकारात्मक झाल्याची दोन्ही पक्षातील सूत्रांची माहिती

११)  अमित शहा यांच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांनी कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाहीये.

१२) दोन्ही पक्षातील टीका करणाऱ्यां नेत्यांना संयम बाळगण्याचा फक्त निर्णय झालाय

हे पण वाचा

अमित शहा-उद्धव ठाकरेंची बैठक संपली, युतीची चर्चा रंगली

माधुरी दीक्षितला राज्यसभेची ऑफर, सूत्रांची माहिती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2018 11:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...