Elec-widget

अमित शहा-उद्धव ठाकरेंची बैठक संपली, युतीची चर्चा रंगली

अमित शहा-उद्धव ठाकरेंची बैठक संपली, युतीची चर्चा रंगली

  • Share this:

मुंबई, 06 जून :  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन तास मॅरेथाॅन बैठक पार पडली. या बैठकीत मतभेद आणि मनभेद यावर चर्चा झाल्याचं कळतंय. मात्र, या बैठकीतून मुख्यमंत्र्यांना दूर ठेवण्यात आलं होतं.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये खडा सामना रंगला होता. भाजपने ही निवडणूक जिंकली पण शिवसेना आणि भाजपमध्ये कमालीचे संबंध ताणले गेले होते. त्यानंतर आज खुद्द भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 'मातोश्री'वर दाखल झाले. संध्याकाळी 7.50 च्या सुमारास अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 'मातोश्री'वर दाखल झाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मिलींद नार्वेकर यांनी दोन्ही नेत्यांचं स्वागत केलं. त्यानंतर मातोश्रीवर दोन टप्पात बैठक पार पडली.

पहिल्या टप्प्यात उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यात एक बैठक पार पडली. त तर दुसरीकडे अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एकत्रित पहिले काही वेळ बैठक झाली.

त्यानंतर अमित शहा आणि उद्धव ठाकरे याच्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत स्वतंत्र बैठक झाली. या बैठकीत

Loading...

शिवसेना भाजप यांच्यातील राजकीय मतभेद आणि मनभेद यावर चर्चा झाल्याचं कळतंय. अमित शहा यांनी मोदी सरकार करत असलेल्या योजना निर्णय याची माहिती उद्धव ठाकरेंना दिली.

परंतु, अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूर ठेवण्यात आलं होतं. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यातच बंद दाराआड चर्चा झाली.

अमित शहांना माधुरीच्या घरी कांदे पोहे तर 'मातोश्री'वर ढोकळा-गाठिया !

विशेष म्हणजे, बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरे स्वत: अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांना सोडण्यासाठी दारापर्यंत आले होते.

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 'संपर्क फाॅर समर्थन' अभियानासाठी दुपारी मुंबईत दाखल झाल्यानंतर  बाॅलिवूडची अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या जुहू येथील घरी जाऊन भेट घेतली. या भेटीत माधुरीला संपर्क ते समर्थन अभियानाची माहिती देण्यात आली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरीला भाजपकडून राज्यसभेची आॅफरही देण्यात आलीये.

माधुरी दीक्षितला राज्यसभेची ऑफर, सूत्रांची माहिती

माधुरीच्या भेटीनंतर अमित शहांनी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेतली. त्यानंतर लता मंगेशकर यांची भेट होणार होती. मात्र, लतादीदींच्या तब्येतीच्या कारणास्तव ही भेट होऊ शकली.

संध्याकाळी 6 च्या सुमारास अमित शहा सिद्धीविनायक मंदिरात पोहोचले. त्यानंतर अमित शहांनी मुंबईचे शहर अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांची सांत्वन पर भेट घेतली. आशिष शेलार यांना मातृशोक झालाय. त्यांचं सांत्वन करण्यासाठी अमित शहा आशिष शेलारांच्या घरी पोहोचले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2018 10:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...