मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'अमित शहा खुनी है'च्या घोषणांनी सभागृहात राडा, सत्ताधारी आणि भाजप आमनेसामने

'अमित शहा खुनी है'च्या घोषणांनी सभागृहात राडा, सत्ताधारी आणि भाजप आमनेसामने

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचे (Mansukh Hiren death case) तीव्र पडसाद आज अधिवेशनात  उमटले.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचे (Mansukh Hiren death case) तीव्र पडसाद आज अधिवेशनात उमटले.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचे (Mansukh Hiren death case) तीव्र पडसाद आज अधिवेशनात उमटले.

 

मुंबई, 09 मार्च :  मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचे (Mansukh Hiren death case) तीव्र पडसाद आज अधिवेशनात (maharashtra budget session 2021) उमटले. मनसुख हिरेन यांची पोलीस अधिकारी सचिन वाझे (sachin waze) यांनी हत्या केल्याचा आरोप भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकच शाब्दिक चकमक उडाली. याच दरम्यान, 'अमित शहा खुनी है' (Amit shah) च्या घोषणा देण्यात आल्याने वातावरण आणखी तापले.

देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणा मुद्दा उपस्थितीत केला आणि थेट सचिन वाझे यांच्या नावाचा उल्लेख करत अटकेची मागणी केली.

त्यानंतर अनिल परब हे बोलण्यासाठी उभे राहिले 'ज्यांच्या मृत्यू संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी आवाज मिळाला पाहिजे अशी मागणी केली आहे ती योग्य आहे. पण सात वेळा खासदार राहिलेल्या मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये ज्यांची नावं आहे, त्यांनाही अटक झाली पाहिजे' अशी मागणी केली.

72 लाख बेस प्राइज विक्री झाली 512 कोटींना! खेळाडू नव्हे तर दारु दुकानाचा लिलाव

'मोहन डेलकर यांची सुसाईड नोट माझ्या हातात आहे, त्यात कोणाचंही नाव नाही. वाझे यांना वाचवण्याकरता डेलकरचे नाव पुढे केलं जात आहे' असा पलटवार फडणवीस यांनी केला.

त्यानंतर सत्ताधारी आणि भाजपच्या आमदारांमध्ये एकच गोंधळ उडाला. दोन्ही बाजूचे सदस्य वेलजवळ आले आणि जोरदार घोषणाबाजी  केली.

नाना पटोले म्हणाले की, 'त्या ठिकाणी स्फोटकांनी भरलेली गाडी कशी जाऊ शकते, त्यांना तीन स्तरीय सुरक्षा आहे. महाराष्ट्र एटीएस सगळ्यात चांगलं आहे. मोहन डेलकर विद्यमान खासदार आहेत तरी गुन्हा कसा दाखल होत नाहीये? हे सगळे संशयास्पद आहे.'

भयंकर! चेटकीण असल्याचा आरोप करत महिलेला मारहाण, घरात घुसून झाडली गोळी

गृहमंत्री अनिल देशमुख निवेदन देण्यासाठी उभे राहिले असता दोन्ही बाजूने गोंधळ सुरू झाला. त्यामुळे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते.

याच दरम्यन, सभागृहात 'अमित शहा खुनी है; अशा घोषणा देण्यात आल्या. त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. 10 मिनिटानंतर सभागृहाचे   कामकाज सुरू झाले पण गोंधळामुळे पुढे अर्धा तास तहकूब करण्यात आले.

सभागृहातील गदारोळानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या भेटीस बजावली. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलवण्यात आली.  याबैठकीला अजित पवार, देवेंद्र फडणवीस, अनील देशमुख, अनील परब उपस्थित होते. त्यानंतर अजित पवार आणि अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले.

First published:
top videos

    Tags: Ajit pawar, Devendra Fadnavis