S M L

मोदींनी देशाची विचार करण्याची पद्धतच बदलली- अमित शहा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या हस्ते आज पंतप्रधान मोदींवरच्या एका पुस्तकाचं प्रकाशन झालं. हमारे नरेंद्र भाई असं या पुस्तकाचं नाव आहे.

Sonali Deshpande | Updated On: Aug 27, 2017 06:13 PM IST

मोदींनी देशाची विचार करण्याची पद्धतच बदलली- अमित शहा

मुंबई, 27 आॅगस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या हस्ते आज पंतप्रधान मोदींवरच्या एका पुस्तकाचं प्रकाशन झालं. हमारे नरेंद्र भाई असं या पुस्तकाचं नाव आहे. या कार्यक्रमात बोलताना शहांनी मोदींवर स्तुतिसुमनं उधळली.

आपल्या देशात घराणेशाहीच्या जोरावर सत्तेत राहण्याची परंपरा आहे. पण मोदींना जे यश मिळालं, ते त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे. गुजरातमध्ये त्यांनी पक्ष मजबूत केला. कार्यकर्ते घडवले. ते गुजरातमध्ये होते तेव्हा बूथवरच्या कार्यकर्त्याशी त्यांचा संपर्क असायचा, असं शहा म्हणाले.

अमित शहा म्हणाले, ' तेव्हा एखादी वीज कडाडावी आणि त्याच्या लख्ख प्रकाशात समोरचा रस्ता दिसावा असे मोदी समोर आले. मोदींनी १८ महिन्यात गुजरातमध्ये २४ तास वीज मिळवून दिली. मोदींनी सर्वसमावेशक विकासाचं माॅडेल गुजरातमध्ये आणलं.'मोदींनी देशाची विचार करण्याची पद्धतच बदलली. सर्जीकल स्ट्राईकमुळे देशाकडे जगाचा बघण्याचा दृष्टीकोन बदलला,' असंही शहा म्हणाले.

'मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये प्रत्येक मंत्री स्वत:ला पीएम मानत होता पण पीएम स्वत:ला पीएम मानत नव्हते, मोदींनी पंतप्रधानपदाला पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करून दिली,' शहा म्हणाले.

विदेशात मोदींचं स्वागत हे देशांतल्या १२५ कोटी नागरिकांचं स्वागत असतं, असंही अमित शहांनी सांगितलं.

Loading...
Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 27, 2017 06:13 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close