S M L

मुंबईत अमित शहांचं जंगी स्वागत, विमानतळ ते वांद्रे काढली बाईक रॅली

या महामेळाव्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह गुरूवारीच मुंबईत दाखल झाले.

Sachin Salve | Updated On: Apr 6, 2018 09:43 AM IST

मुंबईत अमित शहांचं जंगी स्वागत, विमानतळ ते वांद्रे काढली बाईक रॅली

मुंबई, 06 एप्रिल : भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त आज मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुल मैदानावर महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. या महामेळाव्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह गुरूवारीच मुंबईत दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळ ते वांद्रे अशी बाईक रॅली काढण्यात आली होती.

देशभरातून हजारोंच्या संख्येनं भाजप कार्यकर्त्ये मुंबईत दाखल होत आहेत. या महामेळाव्याच्या निमित्तानं भाजप शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतेय. दरम्यान रात्री सोफिटेल हॉटेलमध्ये अमित भाजपच्या उपस्थितीत भाजप कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, एकनाथ खडसे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांच्यासह इतर महत्त्वाचे नेतेही उपस्थित होते..

मेळाव्याची तयारी, मंत्रिमंडळ विस्तार, 2019 मधली लोकसभा निवडणूक, महाराष्ट्रात पक्ष कार्यालयाच्या बांधकामांना होणारी  दिरंगाई इत्यादी महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर स्वत: अमित शहानी वांद्रे-कुर्ला संकुलावर जाऊन महामेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतला..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 6, 2018 09:43 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close