S M L

अमित शहांना माधुरीच्या घरी कांदे पोहे तर 'मातोश्री'वर ढोकळा-गाठिया !

माधुरीच्या घरी मराठमोळ्या तर मातोश्रीवर गुजराती खाद्यपदार्थ या सगळ्यामुळे अमित शहांना संस्कृतीदर्शन होणार हे नक्की.

Renuka Dhaybar | Updated On: Jun 6, 2018 06:16 PM IST

अमित शहांना माधुरीच्या घरी कांदे पोहे तर 'मातोश्री'वर ढोकळा-गाठिया !

मुंबई, ता. 06 जून : भाजपचे अध्यक्ष अमित शहा भाजप संपर्क अभियानासाठी मुंबई दौऱ्यावर आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांची मातोश्रीवर भेट होणार आहे. संध्याकाळी ७ वाजता ही भेट होणार आहे. या भेटीचं खास वैशिष्ट्य म्हणजे मातोश्रीने पाहुण्यांच्या आदरातिथ्यासाठी खास गुजराती पदार्थ नाश्त्यासाठी ठेवलेत. ढोकळा, गाढीया आणि खांडवी हे गुजराती पदार्थ नाश्त्यामध्ये असणार आहेत.

दरम्यान, आज दुपारी अमित शहा यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या जुहू येथील घरी भेट घेतली. या भेटीत अमित शहा यांचं आदरातिथ्य मराठमोळ्या पद्धतीने करण्यात आलं. या भेटीच्या वेळी मराठमोळे कांदे पोहे आणि चहा, कॉफी देऊन अमित शहा यांचं स्वागत करण्यात आलं. या भेटीच्या वेळी अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि भाजपचे पश्चिम विभाग प्रभारी वी सतिश उपस्थित होते.

माधुरीच्या घरी मराठमोळ्या तर मातोश्रीवर गुजराती खाद्यपदार्थ या सगळ्यामुळे अमित शहांना संस्कृतीदर्शन होणार हे नक्की. आता मातोश्रीवरची नाश्ता डिप्लोमसी खरोखरच शिवेसना भाजपचं मनोमिलन होणार का...? हाच खरा प्रश्नं आहे.

मातोश्रीवर काय असणार पाहुणचारामध्ये ?

ढोकळा

Loading...
Loading...

गुजराती गाठिया

खांडवी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 6, 2018 06:16 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close