अमित शहांनी विरोधकांना दिली साप, कुत्रा, मुंगूसाची उपमा!

तसा मोदींचा पूर आलेला असून सगळे विरोधी पक्ष एकत्र येणयाचा प्रयत्न करत आहेत अशी टीका त्यांनी केली.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Apr 6, 2018 03:24 PM IST

अमित शहांनी विरोधकांना दिली साप, कुत्रा, मुंगूसाची उपमा!

06 एप्रिल:  पक्षाध्यक्ष अमित  शहा यांनी आज भाजपच्या  महामेळाव्यात विरोधकांना साप कुत्रा  आणि मुंगूसाची  उपमा दिली आहे. भाजपचा आज38  वा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्त मुंबईतील बीकेसी ग्रांऊंडवर   झालेल्या महामेळाव्यात ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.

भाजप   विरूद्ध सगळे विरोधी पक्षनेते एकत्र येत आहेत. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले .की जेव्हा एक मोठा पूर येतो. तेव्हा त्या पूरापासून वाचण्यासाठी सगळे प्राणी  एका वटवृक्षावर चढतात.  मग साप असो कुत्रा असो मुंगूस असो, चित्ता असो सगळे त्या झाडावर चढून स्वत:चे प्राण वाचवण्याचा प्रयत्न   करतात.  तसा मोदींचा पूर आलेला असून सगळे विरोधी पक्ष एकत्र येणयाचा प्रयत्न करत आहेत अशी टीका त्यांनी केली. आपल्या भाषणात ते राहुल गांधींवर भरपूर बरसले.  भाजप दोन खासदारकीच्या जागा हरला म्हणून राहुल गांधींनी मिठाई वाटली पण राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा 11 राज्यांमध्ये पराभव झाला  आणि तुम्ही  मिठाई कसली वाटता असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राहुल गांधींची टीका खोटी असल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच दलितांच्या हक्कांना आणि आरक्षणाला कोणीच धक्का लावणार नाही  अशी हमी त्यांनी दिली. कोणी जर आरक्षण काढायचा प्रयत्न केला  तर आम्ही त्यांना आरक्षणाला धक्काही लावू देणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं. तसंच पवारांवरही त्यांनी टीका केली.

तसंच जागतिक पातळीवर भारताचं स्थान उंचावतंय इस्त्राईल अमेरिकेनंतर फक्त भारतातच  तेही मोदींच्या नेतृत्वाखालील भारताकडेच सर्जिकल स्ट्राईक करण्याची क्षमता आहे असं  विधान त्यांनी केलं .  या मेळाव्याला राज्यभरातून कार्यकर्ते   आले आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 6, 2018 03:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...