अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन; एनडीएच्या बैठकीचं दिल निमंत्रण

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फोन केला.

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 7, 2017 11:31 AM IST

अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन; एनडीएच्या बैठकीचं दिल निमंत्रण

07  एप्रिल :  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फोन केला. अमित शहा यांनी गुरुवारी रात्री उद्धव ठाकरेंना फोन करुन एनडीएतील घटकपक्षांच्या बैठकीचं निमंत्रण दिलं. मात्र रविंद्र गायकवाड प्रकरणानंतर एनडीएच्या बैठकीला शिवसेना जाणार का हाच खरा प्रश्न आहे.

कारण, एअर इंडियानं खासदार रवींद्र गायकवाड यांचं विमान तिकीट पुन्हा एकदा रद्द केलं आहे. 17 आणि 24 एप्रिलसाठी त्यांनी आज सकाळी 5 वाजता तिकीटं बुक करायचा प्रयत्न केला. पण त्यांचं तिकीट रद्द करण्यात आलं. म्हणजेच एकीकडे काल शिवसेनेनं गायकवाडांवरची प्रवासबंदी उठवण्याची मागणी केली. ती पूर्ण होईल असंही वाटत असताना आता हा वाद आणखी चिघळणार असं दिसतं.

दरम्यान, या बैठकीला उद्धव ठाकरे जाणार की नाहीत, किंवा शिवसेनेतर्फे कोण जाणार याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.

एनडीएतील घटकपक्षांच्या बैठकीचं कारण?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत भाजपने दिल्लीत पुढील आठवड्यात 10 एप्रिलला एनडीएतील घटकपक्षाची बैठक आयोजित केली आहे. त्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी गुरुवारी रात्री त्यांना फोन करुन निमंत्रण दिलं. साधारण 2 ते 3 मिनिट त्यांच्या संभाषण झालं. शिवसेनेची 25 हजार मतं आहेत. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची भूमिका महत्त्वाची आहे. सेनेच्या भूमिकेवरच राष्ट्रपती कोण होणार हे स्पष्ट होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2017 11:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...