अमित शहांनी टाळली उद्धव ठाकरेंची भेट, शिवसेना अजूनही वेटिंगवरच!

अमित शहांनी टाळली उद्धव ठाकरेंची भेट, शिवसेना अजूनही वेटिंगवरच!

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं आणि सगळं चित्रच बदलून गेलंय. त्यानंतर भाजपचा कोणताही मोठा नेता मातोश्रीवर गेलेला दिसला नाहीये.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई 22 सप्टेंबर : गणपती विसर्जनापूर्वीच युती होईल असं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे नेते म्हणत होते. मात्र आता आचारसंहिता लागल्यानंतरही युतीचा फॉर्म्युला काही नक्की ठरत नाहीये. त्यातच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मुंबईत येऊनही त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट टाळली आणि भाषणातही शिवसेनेचा उल्लेख केला नाही. तसंच शिवसेनेचेही कोणतेही नेते शाहांना भेटायला आले नाहीत. या सगळ्यावरुन भाजपा आणि शिवसेनेत जागावाटपाबाबत बद्दल ऑल इज वेल नसल्याचेच दिसून आलंय. युतीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील असं चंद्रकांत पाटील म्हणतायंत. तर स्वतः उद्धव ठाकरेही उपहासात्मक पद्धतीनेच युती बद्दल बोलतायंत. विधानसभेत युतीसाठी शिवसेनाच ताटकळत बसली असल्याचं यामुळे सातत्याने दिसून येतंय.

93 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो

लोकसभा निवडणुकीपूर्वी नेमका काय निकाल लागेल याबद्दल भाजपचे नेते साशंक होते. त्यामुळेच स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती होण्यापूर्वी अनेक वेळा मातोश्री वारी केली होती. स्वतः अमित शाह युती व्हावी यासाठी साडेतीन तास मातोश्रीवर तळ ठोकून होते आणि लोकसभेचा भाजपा 25 शिवसेना 23 असा अंतिम फॉर्म्युला घेऊनच मातोश्रीबाहेर पडले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेवटचे लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी मातोश्रीवर गेले होते. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं आणि सगळं चित्रच बदलून गेलंय. त्यानंतर भाजपचा कोणताही मोठा नेता  मातोश्रीवर गेलेला दिसला नाहीये. आपल्या आक्रमकपणाबद्दल प्रसिद्ध असलेली शिवसेना विधानसभा निवडणुकीसाठी युती बाबत आता  बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे अगदी उद्धव ठाकरे यांना नरेंद्र मोदीं समोर आपली युती होणार असे स्वतःहून म्हणावं लागलं होतं.

अमित शहानंतर मुंबईतील भाजप नेत्याचाही शरद पवारांवर हल्लाबोल, म्हणाले...

युती होणार किंवा होणार नाही, जागावाटपाचा काय फॉर्म्युला असेल ते यथावकाळ कळणार आहे. पण यानिमित्ताने शिवसेना युतीतला छोटा भाऊ आहे हे सिद्ध झालंय. थोडी फार ओढतान झाली तरी युती कायमच ठेवावी अशी शिवसेना नेत्यांची इच्छा आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 22, 2019, 5:56 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading