NCB मध्ये IRS अधिकारी असलेल्या समीर वानखेडे यांची 4 महिन्यांची मुदतवाढ 31 डिसेंबर 2021 रोजी पूर्ण झाली होती. त्यांना पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता अनेक दिवसांपासून वर्तवली जात होती. मात्र असं झालं नाही. मुंबईतील ड्रग्ज प्रकरणाच्या तपासामुळे समीर वानखेडे प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यानंतर आर्यन खानच्या अटकेनंतर ते सतत चर्चेत होते. मध्यंतरी ते वादाच्या भोवऱ्यातही अडकले. यादरम्यान झोनल डायरेक्टरचा अतिरिक्त कार्यभार ब्रिजेंद्र चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्या जागी आता अमित गवाटे यांची नियुक्ती झाली 'काल मुस्लीम वेशभूषा, आज हनुमान अन् उद्या...?' शिवसेना भवनासमोर राज ठाकरेंविरोधात पोस्टरबाजी समीर वानखेडे डेप्युटेशनवर सप्टेंबर 2020 मध्ये एनसीबीच्या मुंबई कार्यालयात रुजू झाले होते.ऑगस्ट ते डिसेंबर 2020 या कालावधीत समीर वानखेडे यांनी 96 जणांना अटक करत 28 केसेस दाखल केल्या. तर 2021 मध्ये त्यांनी 234 लोकांना अटक करत 117 केसेस दाखल केल्या आहेत. वानखेडे यांनी त्यांच्या काळात 1 हजार कोटी रुपयांचं 1791 किलो ड्रग्ज जप्त केलं तर काही संपत्ती देखील जप्त केली. समीर वानखेडे यांनी कॉर्डिलिया क्रुझवरील पार्टीवर छापा टाकत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर 8 जणांना अटक केली होती. आर्यन खानच्या अटकेनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी समीर वानखेडेंवर गंभीर आरोपही करण्यात आले होते. यानंतर ते चर्चेत होते.Amit Fakkad Gawate appointed as new the Zonal Director of Narcotics Control Bureau, Mumbai
— ANI (@ANI) April 14, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: NCB