मुंबईच्या दिशेने निघालेल्या एम्ब्युलन्सला अपघात, 6 पैकी 4 जण जखमी

मुंबईच्या दिशेने निघालेल्या एम्ब्युलन्सला अपघात, 6 पैकी 4 जण जखमी

मालेगाववरून मुंबईच्या दिशेने निघालेल्या एका एम्ब्युलन्सला ठाण्याच्या दरम्यान मोठा अपघात झाला आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही आहे.

  • Share this:

08 एप्रिल : मालेगाववरून मुंबईच्या दिशेने निघालेल्या एका एम्ब्युलन्सला ठाण्याच्या दरम्यान मोठा अपघात झाला आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही आहे. पण दरम्यान एम्ब्युलन्समधील ६ पैकी ४ जण जखमी झाले आहेत. सध्या त्यांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पुर्व दुर्तगती मार्गावरील आनंद नगर ऑक्ट्रॉय नाका येथे या एम्ब्युलन्सला पहाटेच्या सुमारास अपघात झाला. पण या अपघातानंतर ठाणे मनपा आपत्ती व्यवस्थापनाने तात्काळ हालचाली करुन जखमींना मदत केल्याने जखमींना वेळेत रुग्णालयात दाखल केलं गेलं आहे.

पण दरम्यान हा अपघात कसा झाला याबद्दल कोणतीही तपास अद्याप समोर आलेला नाही आहे. 'MH 41 A 5034' असा या एम्ब्युलन्सचा नंबर आहे.

First published: April 8, 2018, 8:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading