अंबरनाथ पंचायत समितीत सेना-राष्ट्रवादीची सत्ता,भाजपचा धुव्वा

अंबरनाथ पंचायत समितीत सेना-राष्ट्रवादीची सत्ता,भाजपचा धुव्वा

सर्वच्या सर्व ८ जागांवर शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीचे उमेदवार विजयी झाले आहे

  • Share this:

14 डिसेंबर : अंबरनाथ तालुक्यात पंचायत समितीत शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपच्या ताब्यातून सत्ता हिसकावून घेतलीये. सर्वच्या सर्व ८ जागांवर शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीचे उमेदवार विजयी झाले आहे.

अंबरनाथ पंचायत समिती निवडणुकीत सेना राष्ट्रवादीने एक हाती सत्ता मिळवलीये. आठ जागांसाठी शिवसेना-राष्ट्रवादीने युती केली केली. सेना आणि राष्ट्रवादीच्या युतीने भाजपला चांगलीच टक्कर दिली. परिणामी  भाजपाला पंचायत समितीत शून्य जागा मिळाल्या आहेत. या आधी भाजपची सत्ता होती. सेनेनं ६ जागा तर राष्ट्रवादी २ जागांवर विजय मिळवलाय. सर्व जागांवर कब्जा करत सेना आणि राष्ट्रवादीने भाजपचा धुव्वा उडवलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2017 04:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading