अंबरनाथ स्टेशनवर पेंटाग्राफ तुटून 6 प्रवाशी जखमी

बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानक दरम्यान धावत्या लोकलचा पेंटाग्राफ तुटून ६ प्रवासी जखमी झाले आहेत.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 19, 2017 09:02 PM IST

अंबरनाथ स्टेशनवर पेंटाग्राफ तुटून 6 प्रवाशी जखमी

19 आॅगस्ट : बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानक दरम्यान धावत्या लोकलचा पेंटाग्राफ तुटून ६ प्रवासी जखमी झाले आहेत. आज दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास  ही घटना  घडली. या विचित्र अपघातात दोन लोकमधील प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशानवर कल्याण येथील  रेल्वेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पेंटाग्राफ तुटल्याने विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येतेय.

दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास कर्जत लोकल ही बदलापूरहून अंबरनाथ च्या दिशेने निघाली होती. बदलापूर आणि अंबरनाथ स्थानक दरम्यान या धावत्या लोकलचा पेंटाग्राफ अचानक  तुटला आणि तो  दरवाजात उभ्या कमलेश यादवानी या प्रवाशाच्या पायाला लागला यात कमलेश यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली  आहे. हा लोकलचा तुटलेला पेंटाग्राफ हा खाली लोंबकळत होता  आणि त्याच वेळेस बदलापूरहुन निघालेली सीएसटी  लोकल ही  अंबरनाथच्या दिशेने निघाली होती. हा लटकत असेलला पेंटाग्राफ अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकलच्या दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांना लागला या विचित्र अपघातात विनय बेडेकर, सचिन घाग हे प्रवासी गंभीर जखमी झाले असून इतर तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत,  विनय बेडेकर , सचिन घाग यांच्यावर  कल्याण येथील  रेल्वेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

समोरून येणाऱ्या लोकल मधील काही वस्तू  आपल्याला  लागली असल्याचे प्रवाशांना वाटले त्यांना काय घडले हे कळेलच नाही असे जखमी प्रवाशांचे म्हणने आहे. या विचित्र अपघतामुळे प्रवाशांच्या  सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 19, 2017 09:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close