अंबरनाथ, 16 डिसेंबर : अंबरनाथ पूर्वेच्या शिवाजी चौकातील मोहन कॅफे हॉटेलचा स्लॅब कोसळला. अंबरनाथमध्ये हॉटेलचा स्लॅब कोसळून 6 जण जखमी झाले आहेत. हॉटेलच्या वरच्या मजल्यावर अनधिकृतपणे नूतनीकरणाचं काम सुरू होतं. या कामामुळेच हॉटेलचा स्लॅब कमकुवत होऊन कोसळल्याची प्राथमिक माहिती सुत्रांनी दिली. विजय शिंदे (५०), ललिता शिंदे (५०), रुपेश शिंदे (३१), राकेश शिंदे (२९), नीलम शिंदे (२८) आणि श्रेयस शिंदे (६) असे सहाजण अशी जखमी झालेल्यांची नावं असन, सर्व जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.