शाळेत खिचडी बनवणारी मावशी बनली करोडपती, 'हॉट सीट'वर अशा पोहोचल्या बबिताताई!

शाळेत खिचडी बनवणारी मावशी बनली करोडपती, 'हॉट सीट'वर अशा पोहोचल्या बबिताताई!

संसाराला हातभार लावण्यासाठी बबिताताई देखील शालेय विद्यार्थ्यांसाठी खिचडी शिजवण्याचे काम करतात.

  • Share this:

मुंबई,18 सप्टेंबर: शालेय विद्यार्थ्यांसाठी खिचडी शिजवण्याचे काम करणाऱ्या एका महिलेने 'कौन बनेगा करोडपती'च्या अकराव्या सीझनमध्ये तब्बल एक कोटी रुपये जिंकले. बबिता सुभाष ताडे (रा.अंजनगाव सुर्जी, जि.अमरावती) असे या महिलेचे नाव आहे. बबिताताई यांना केवळ दीड हजार पगार आहे. बबिताताई दीड हजार ते एक कोटीचा प्रवास अक्षरश: थक्क करणारा आहे. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी खुद्द 'ट्विटर'च्या माध्यमातून बबिताताईंचे कौतुक केले आहे.

बबिताताईंचाही संसाराला हातभार...

बबिता ताडे यांचे पती सुभाष ताडे शिपाई आहेत. ते गेल्या 23 वर्षापासून पंचफुलाबाई हरणे विद्यालयात कार्यरत आहेत. बबिता ताडे यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगी पुण्याला तर मुलगा अंजनगाव इथेच शिक्षण घेत आहे. संसाराला हातभार लावण्यासाठी बबिताताई देखील शालेय विद्यार्थ्यांसाठी खिचडी शिजवण्याचे काम करतात. विशेष म्हणजे बबिताताई या पदवीधर आहेत. काही दिवस स्पर्धा परीक्षाही दिल्या, परंतु कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना त्यांना अभ्यास अर्ध्यात सोडावा लागला.

'हॉट सीट'वर अशा पोहोचल्या बबिताताई..

बबिताईंना वाचनाची आवड आहे. 'कौन बनेगा करोडपती'च्या 11 व्या सीझनमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. या सीझनसाठी 32 लाख इच्छुक आले होते. त्यापैकी 4 हजार 800 स्पर्धक पात्र ठरले. त्यातून ऑडिशनसाठी 2100 स्पर्धक पात्र ठरलेय. त्यातून बबिताताई हॉट सीटवर पोहोचल्या. बबिताताई हॉट सीटपर्यंत पोहोचल्याच नाही तर त्यांनी तब्बल एक कोटी रुपये जिंकले आहेत. अमिताभ बच्चन आणि बबिताताईंची एक कोटी रुपये जिंकल्याची सोनी टीव्हीची व्हिडीओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. 'कौन बनेगा करोडपती'चा हा भाग आज (18 सप्टेंबर) आणि उद्या (19 सप्टेंबर) प्रसारित होणार आहे.

धक्कादायक! शाळेनं प्रवेश नाकारला, का तर म्हणे पहिलीतला विद्यार्थी मारतोय डोळा

Published by: Sandip Parolekar
First published: September 18, 2019, 6:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading