शेतकरी संपाबाबत खऱ्या शेतकरी नेत्यांशी चर्चा करायला सदैव तयार-मुख्यमंत्री

शेतकरी संपाबाबत खऱ्या शेतकरी नेत्यांशी चर्चा करायला सदैव तयार-मुख्यमंत्री

जे केवळ शेतकऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपली पोळी भाजून काढतात अशा लोकांना शेतकरीच त्यांची जागा दाखवतील असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राजू शेट्टी यांचं नाव न घेता टोला लगावला.

  • Share this:

05 जून : जे आंदोलनाच्या नावावर राजकीय पोळी भाजताहेत त्यांच्याशी चर्चा करणार नाही. मी खऱ्या शेतकऱ्यांशीच चर्चा करणार अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलीये.

दोन दिवसांपूर्वी शेतकरी संघटनेच्या नेत्यांशी चर्चा करून शेतकरी संप मिटवण्यासाठी चर्चा करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता नवीन भूमिका मांडत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर निशाणा साधला. शेतकरी संप मिटत नसल्यामुळे खऱ्या शेतकरी नेत्यांची चर्चा करणार असल्याचं म्हटलंय.

शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्याला वेठीस धरणे हे एक प्रकारचं पापच आहे. तरी देखिल खऱ्या शेतकऱ्याचे नेते असतील ते सत्तेत असतील किंवा नसतील त्यांच्यासोबत चर्चा करण्यास तयार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

तसंच पण जे केवळ शेतकऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपली पोळी भाजून काढतात अशा लोकांना शेतकरीच त्यांची जागा दाखवतील असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राजू शेट्टी यांचं नाव न घेता टोला लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2017 07:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading