आदित्य ठाकरेंच्या 'ड्रिम प्रोजेक्ट'मध्ये नवी मागणी, या हॉटेल्सनाही रात्रभर परवाना द्या

आदित्य ठाकरेंच्या 'ड्रिम प्रोजेक्ट'मध्ये नवी मागणी, या हॉटेल्सनाही रात्रभर परवाना द्या

आहार या हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेची मागणी आहे. 

  • Share this:

मुंबई 21 जानेवारी : 26 जानेवारीपासून मुंबईतील मॉल्स आणि मिल कंपाऊंड मधील हॉटेल 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला तरी हॉटेल व्यावसायिक मात्र या निर्णयाने खुश नाहीत. कारण त्यांच्यामते  या निर्णयाने मॉल्स मधील हॉटेल कितीही दर आकारातील याची भीती तर आहेच पण त्यांची मग मक्तेदारी होईल असाही एक सूर हॉटेल व्यावसायिकांचा आहे. इतकंच काय पण जे पर्यटक मॉल पर्यंत पोहोचणार नाहीत अशांसाठी रेल्वे स्टेशन बाहेरचे हॉटेल खुले ठेवण्याची मागणी आहार ने केलीय. मुंबईतील प्रमुख रेल्वे स्टेशन म्हणजेच सिएसएमटी, दादर, बांद्रा, कुर्ला या न अशा प्रमुख स्टेशन बाहेरील हॉटेल खुली ठेवावी. ज्यामुळे आंतरराज्यीय पर्यटकांना खाण्यासाठी कुठे भटकायला नको, कारण अनेक मेल एक्सप्रेस या रात्रभर मुंबईत येत असतात.

आहार म्हणजेच हॉटेल व्यावसायिकांची संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी म्हणाले, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंच्या या निर्णयाच स्वागत करतो,  मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि इथे पर्यटनाला चालना मिळण्यासाठी हा निर्णय गरजेचा आहे. पण सगळेच पर्यटक मॉल्स मध्येच कसे जाणार, पर्यटक हा काही परदेशीच असतो असं तर नाही त्यामुळे बांद्रा, दादर, कुर्ला परिसरात हॉटेलना 24 तास खुले ठेवण्याची परवानगी द्यावी.आम्ही तसं पत्र लवकरच पर्यंटनमंत्र्यांना देऊ पण याआधी मंत्र्यांना आम्ही कल्पना दिली आहे. आणखी महत्वाचा भाग म्हणजे, परवानग्या जरी मिळाल्या तरी जर धंदा झाला तरच हॉटेलमालक हॉटेल 24 तास खुलं ठेवतील'

पतंग उडविताना युवकाचा तोल गेला, इमारतीच्या छतावरून पडल्याने मृत्यू

काही हॉटेलमालकांच्या मते 24 तास हॉटेल खुली ठेवण्यापेक्षा  शुक्रवार आणि शनिवारी या दोन दिवशी सकाळी 3 वाजेपर्यंत शेवटची ऑर्डर घेण्याची परवानगी द्यावी. ज्यामुळे आमच्यावर कर्मचाऱ्यांच्या पगाराचा, विजेच्या बिलाचा अधिकचा भार पडणार नाही. आणि आमच्या किचनलाही थोडा अवधी मिळेल.

'पाथरी'च जन्मस्थान, सिद्ध झालं नाही तर राजीनाम्याची शिवसेना खासदाराची प्रतिज्ञा

या मागण्या पुढे येत असल्या तरी 26 जानेवारीच्या रात्रीपासून मॉल्स आणि मिल कंपाऊंड मधील हॉटेल  म्हणजे ज्यांना स्वतःची सुरक्षा यंत्रणा आहे आणि रहिवाशी भागा पासून दूर असलेल्या ठिकाणी सुरवातीच्या टप्प्यात 24 तास हॉटेल खुली राहतील.

'फक्त मुस्लिमांच्या आग्रहामुळे काॅंग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत'

मॉल्स मधील इतर दुकानांना ही खुलं राहण्याची मुभा असली तरी किती दुकानदार दुकान खुली ठेवतील याबद्दल साशंकता आहे. एकतर ऑनलाइन शॉपिंगचा आधीच या दुकानांना मोठा फटका बसलाय. अशात एक शिफ्टचे कर्मचारी आणि इतर खर्च पाहता हे दुकानदार 24 तास ग्राहकांचं स्वागत कसे करतील असा प्रश्न आता विचारला जातोय.

First published: January 21, 2020, 5:24 PM IST

ताज्या बातम्या