• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • Corona प्रतिबंधक लस न घेतलेल्या नागरिकांनाही लोकल प्रवासाची परवानगी द्या, उच्च न्यायालयात याचिका

Corona प्रतिबंधक लस न घेतलेल्या नागरिकांनाही लोकल प्रवासाची परवानगी द्या, उच्च न्यायालयात याचिका

 स्थानकांवरील पासच्या समस्येसाठी ऑफलाइन प्रणाली 11 ऑगस्ट 2021 पासून दररोज सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत कार्यान्वित होईल.

स्थानकांवरील पासच्या समस्येसाठी ऑफलाइन प्रणाली 11 ऑगस्ट 2021 पासून दररोज सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत कार्यान्वित होईल.

Mumbai Local Train updates: मुंबईतील लोकल ट्रेनमधून सरसकट सर्वांनाच प्रवासाची परवानगी द्यावी अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

 • Share this:
  मुंबई, 31 ऑगस्ट : ज्या नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीचे (Covid Vaccine) दोन्ही डोस घेतले आहेत अशा नागरिकांना लोकल ट्रेनमधून (Mumbai Local Train) प्रवासाची परवानगी राज्य सरकारने (Maharashtra Government) दिली आहे. मात्र, आता सरसकट सर्वच नागरिकांना मुंबई लोकलमधून प्रवासाची परवानगी देण्याची मागणी होऊ लागली आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) एक याचिका सुद्धा दाखल करण्यात आली आहे. ज्या नागरिकांचे लसीकरण झालेले नाहीये अशा नागरिकांनाही मुंबईतील लोकल ट्रेनमधून प्रवासाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यासोबतच केवल लसीकरण झालेल्या नागरिकांनाच लोकल प्रवासाची मुभा का? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. Dahi Handi: मनसेने दहीहंडी लावलीच; ठाण्यात विविध ठिकाणी हंडी फोडून मनसेकडून सरकारचा निषेध वैद्यकीय सल्लागार योहन टेंग्रा यांनी अॅडवोकेट अभिषेक मिश्रा यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांनाच केवळ लोकलमधून प्रवासाची मुभा देण्याचा निर्णय म्हणजे आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वांच्या विरोधात आहे असंही याचिकेत म्हटलं आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी अद्यापही अनेक निर्बंध लागू आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस ज्या नागरिकांनी घेतले आहेत अशा नागरिकांनाच लोकलमधून प्रवासाची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने 10 ऑगस्ट रोजी घेतला आहे. पण हा निर्णय म्हणजे केंद्राच्या मार्गदर्शक तत्वांच्या विरोधात असल्याचंही याचिकेत म्हटलं आहे.
  Published by:Sunil Desale
  First published: