शिवसेनेच्या या नेत्याला मिळाला गिरीश महाजन यांच्या ताब्यातील 'शिवनेरी'

शिवसेनेच्या या नेत्याला मिळाला गिरीश महाजन यांच्या ताब्यातील 'शिवनेरी'

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुभाष देसाई आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना अखेर शासकीय निवासस्ठान मिळाले

  • Share this:

सागर कुलकर्णी(प्रतिनिधी),

मुंबई,6 डिसेंबर: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुभाष देसाई आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना अखेर शासकीय निवासस्ठान मिळाले आहे. सुभाष देसाई यांना माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा 'शिवनेरी' तर दिवाकर रावते यांचा 'मेघदूत' बंगला बाळासाहेब थोरात यांना देण्यात आला आहे. काही दिवस आधी शपथ धेतलेले मंत्री यांना शासकीय बंगला वाटप झाले होते. आता देसाई आणि थोरात यांना ही शासकीय बंगला वाटप करण्यात आला आहे. मात्र, सर्वच मंत्र्यांना खातेवाटपाची प्रतिक्षा आहे.

दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण झालेल्या राजकीय स्थितीमुळे ऐतिहासिक महाराष्ट्र विकास आघाडीचा उदय झाला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले. मात्र, पाच वर्षांच्या सहमतीने सरकार चालवण्याचे मोठे आव्हान या तीनही पक्षांसमोर असणार आहे.

लवकरच होणार 'ठाकरे सरकार'चे खातेवाटप..

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन आठवडा उलटला तरीही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप झालेलं नाही. मात्र आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी माहिती काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. भाजपला दूर ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. या महाविकास आघाडीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन केली. शिवाजी पार्क इथे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर इतर 6 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या मंत्र्यांना अद्याप खातेवाटप करण्यात आले नाही.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात मंत्रिपदांबाबत मोठी स्पर्धा सुरू असल्यानं खातेवाटपला मुहूर्त मिळत नसल्याचं बोललं जात आहे. मात्र आता ही कोंडी फुटणार असल्याची माहिती आहे. विधीमंडळ अधिवेशनाआधी खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार होतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, राज्यात होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपल्या समर्थकांचा नंबर लागावा यासाठी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. काँग्रेसचे विधिमंडळ नेते आणि कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांचाही यामध्ये समावेश होता.

बाळासाहेब थोरात आणि सोनिया गांधी यांच्यात जवळपास तीस मिनिटे झालेल्या भेटीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचा दावा थोरात यांनी केला आहे. दुसरीकडे, नवनियुक्त विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीही सोनिया गांधी यांची भेट घेतली. नागपूर मध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार व्हावा असा या काँग्रेसच्या नेत्यांचा प्रयत्न आहे. दरम्यान, आगामी मंत्रिमंडळात काँग्रेसला 13 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये 9 कॅबिनेट, 4 राज्यमंत्री असणार आहेत.

कॅबिनेटपदासाठी काँग्रेस नेत्यांची संभाव्य नावे

विदर्भ (2) : विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर

मुंबई (2): वर्षा गायकवाड, अमीन पटेल

मराठवाडा (2): अशोक चव्हाण, अमित देशमुख

पश्चिम महाराष्ट्र (2): सतेज बंटी पाटील, विश्वजित कदम

9 कॅबिनेट मंत्रिपदांसह काँग्रेसला 4 राज्यमंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.

मंत्रिपदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीतून कुणाची नावं आहेत चर्चेत?

शिवसेना:

दिवाकर रावते, अब्दुल सत्तार, रामदास कदम, तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि गुलाबराव पाटील

राष्ट्रवादी:

धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील, मकरंद पाटील आणि राजेश टोपे

उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात कोणत्या नेत्यांनी घेतली आहे मंत्रिपदाची शपथ?

-एकनाथ शिंदे

-सुभाष देसाई

-जयंत पाटील

-छगन भुजबळ

-बाळासाहेब थोरात

24 तासांत पुन्हा काढला नवा अध्यादेश

कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांना पहिल्यांदा चित्रकूट बंगला देण्यात आला होता. मात्र, 24 तासांत पुन्हा नवीन अध्यादेश काढत राऊत यांना चित्रकूटऐवजी पर्णकुटी शासकीय बंगला देण्यात आला आहे. राऊत यांना आधी दिलेला चित्रकूट बंगला हा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना आता देण्यात आला आहे. चित्रकूट बंगल्यावरून राऊत नाराज होते. त्यामुळे 24 तासांत पुन्हा नवीन जीरआर काढत त्यांना नवा बंगला दिल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती.

शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातील मंत्र्यांना शासकीय निवासस्थानांचे वाटप करण्यात आले. पण काँग्रेस मंत्री अजूनही वेटींगवर असल्याने पक्षात नारजी असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 4 मंत्री आणि 1 विरोधी पक्ष नेत्यांच्या शासकीय निवासस्थानाचे वाटप केले. यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे मंत्र्यांची नावे होती.

शपथ घेतलेल्या मंत्र्यांना अद्याप खात्याचे वाटप तर नाहीच पण शासकीय निवासस्थान वाटप झाले नसल्याने काँग्रेस पक्षात नाराजीचा सूर असल्याची माहिती एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शासकीय निवासस्थानाचे वाटप करण्यात आले आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 6, 2019, 6:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading