मुंबई 18 सप्टेंबर: 2019च्या विधानसभा निवडणुकीत जर स्वतंत्र लढलो असतो तर भाजपला 150 पेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताह कार्यक्रमात फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या भाकिताचा संदर्भ देत फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.
तोरसेकर यांनी 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठं बहुमत मिळेल असं भाकित केलं होतं. त्याची त्यावेळी चर्चा झाली होती. फडणवीस म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या वेळीही तोरसेकरांनी त्यांचा अंदाज सांगितला होता. भाजप स्वतंत्र लढला तर 150 पेक्षा जास्त जागा आणि युती झाली तर 200 पेक्षा जास्त जागा मिळतील असा त्यांचा अंदाज होत.
आम्ही युतीचा पर्याय निवडला आणि पुढचा इतिहास घडला. युती केली ही चूकच झाली असंही ते म्हणाले,
LIVE | श्री भाऊ तोरसेकर यांचे आपल्या यशस्वी पंतप्रधान मा. @narendramodi जी यांच्या कारकिर्दीवर संबोधन...
भाजपा महाराष्ट्र सेवा सप्ताह व्हर्च्युअल रॅली. विरोधी पक्षनेते श्री @Dev_Fadnavis, प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत. https://t.co/kAo41iccN8
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 18, 2020
या कार्यक्रमानंतर बोलतांना फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळाली, तिथं काम देखील सुरू केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं. भूमिपूजनाच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे प्रमुख नेते उपस्थित होते, चळवळीतील नेते उपस्थित होते. दीड वर्षात बरेच काम देखील तिकडे झाले. अचानकपणे हा पायाभरणीचा कार्यक्रम का घेण्यात आला होता ते मला माहिती नाही. पण कार्यक्रम जरी करायचा असेल तर मग लपून-छपून का करता ? असा कार्यक्रम उघडपणे केला पाहिजे.