सगळचं ठरलं तर 'युती'चं घोडं अडलं कुठे?

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेकडून सुभाष देसाई आणि भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन हे चर्चा करत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 20, 2019 03:02 PM IST

सगळचं ठरलं तर 'युती'चं घोडं अडलं कुठे?

मुंबई 20 सप्टेंबर : राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या तारखंची घोषणा केव्हाही होण्याची शक्यता आहे. प्रचारात आघाडी घेतलेल्या भाजप आणि शिवसेनेची युती होणार हे सांगितलं गेलं तरी जागावाटपाचं अजून फायनल झालेलं नाही. शिवसेनेला जास्त जागा पाहिजे असून भाजप तेवढ्या जागा द्यायला इच्छुक नाही असे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसनेच्या मंत्र्यांची बैठक घेऊन आज चर्चा केली. तब्बल तासभर मंत्री आणि उध्दव ठाकरेंमध्ये चर्चा झाली. या बैठकीत उद्धव यांनी सर्व मंत्र्यांना चर्चेची माहिती दिली आणि आश्वस्त केलं की सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तरच युती होणार आहे. मात्र बोलणी सकारात्मक असल्याचंही त्यांनी सांगितलं अशी माहिती सूत्रांनी दिलीय. युतीचा फॉर्म्युला ठरला आहे तर युतीचं नेमकं घोडं नेमकं अडलं कुठे असा प्रश्न आता विचारण्यात येतोय.

वाचा - शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर पवारांच्या उपस्थितीतच राष्ट्रवादीचा नेता म्हणतो...

उद्धव ठाकरे म्हणाले, युती होईल अशी परिस्थिती आहे. माझी भाजप नेत्यांबरोबर बोलणी सुरू आहेत. सन्मानपूर्वक जागा मिळाल्यास युती होईल. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेकडून सुभाष देसाई आणि भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन हे चर्चा करत आहेत. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेही संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे दोन्ही पक्षांनी फार ताणून न धरल्यास पित्रूपक्ष संपल्यानंतर युतीची घोषणा होऊ शकतो अशीही शक्यता व्यक्त केली जातेय.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

युतीचा कुठलाही फॉर्म्युला अजून ठरलेला नाही. फॉर्म्युला अंतिम झाल्यावर लोकसभेप्रमाणे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद होईल. अमित शाह या पत्रकार परिषदेला असतील की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. युतीची घोषणा कधी होईल, तर लवकरात लवकर हाच शब्द योग्य ठरेल. नारायण राणेंच्या प्रवेशाबाबत शिवसेनेला विश्वासात घेऊन मुख्यमंत्री निर्णय घेतील असं त्यांनी याआधीच स्पष्ट केलंय.

Loading...

वाचा - SPECIAL REPORT: राणेंचा 'स्वाभिमान' राहिला कुठे? भाजप प्रवेशाबाबत तारीख पे तारीख

'मनसे' निवडणुक लढविणार?

निवडणूक आयोग लवकरच पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक तारखांची घोषणा करणार आहे. निवडणूक तोंडावर असतानाच राज ठाकरे यांची मनसे मात्र ही निवडणूक लढवायची की नाही, याच संभ्रमात आहेत. मात्र आज बोलावण्यात आलेल्या बैठकीत मनसेचे पदाधिकारी निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती आहे.

निवडणूक जवळ आल्याने आघाडी आणि युतीच्या गोटात जोरदार हालचाली सुरू आहेत. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शांत असल्याचं दिसत होतं. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी मनसेच्या विभागप्रमुखांची बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक संकेत मिळाले आहेत. मनसे काही जागांवर आपले उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे. मनसेचे कार्यालय राजगड येथे राज ठाकरेंनी ही बैठक बोलवली आहे.

वाचा - 'भाई पण नाही छोटा अन् मोठाही नाही',कोल्हेंनी सांगितला मोदींच्या भाषणाचा मतितार्थ

दरम्यान, यापूर्वी मनसे नेत्यांच्या निवडणूक लढवण्याबाबतच्या प्रतिक्रिया राज ठाकरेंनी जाणून घेतल्या होत्या. त्यानंतर आता विभागप्रमुखांना भेटून राज ठाकरे निवडणुकीबाबतची चाचपणी करत आहेत. मात्र मनसे निवडणूक लढणार की नाही हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2019 02:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...